महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या! - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

ठळक बातम्या
ठळक बातम्या

By

Published : Feb 26, 2021, 6:59 AM IST

Updated : Sep 13, 2021, 11:49 AM IST

  • नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेतली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. पाचही राज्यातील निवडणुकी कोरोना महामारी डोळ्यासमोर ठेवून घेतल्या जातील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुका नियोजित आहेत.
  • नागपूर -रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये गुरुवारी 20 जिलेटीन कांड्या, एक धमकीचे पत्र तसेच चार नंबरप्लेट मिळून आल्या होत्या, दरम्यान याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, याप्रकरणाचे नागपूर कनेक्शन समोर येत आहे. या गाडीमध्ये आढळून आलेले इमलशन एक्सप्लोजीव अर्थात जिलेटीन कांड्यांची निर्मिती नागपूरमधील सोलर एक्सप्लोजीव लिमिटेड कंपनीमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे.
  • मुंबई -भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात फादर स्टॅन स्वामी यांच्या जामिनासाठीच्या याचिकेवर विशेष राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) न्यायालय 11 मार्चला निर्णय देणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून 83 वर्षीय फादर स्टेन स्वामी हे तळोजा मध्यवर्ती कारागृहात कोठडीत आहेत.
  • मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती आणि सर्वांत श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी यांच्या बंगल्याच्या काही अंतरावर गुरुवारी सायंकाळी काळ्या रंगाची बेवारस कार आढळली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (बीडीडीएस) या कारची सखोल तपासणी केली असता जिलेटीनच्या 20 कांड्या आढळल्या. संशयित दोन गाड्या पकडण्यासाठी पोलीस आणि एटीएसने सर्वात प्रथम ट्रफिक सिग्नल आणि अंबानींच्या घराच्या आसपास असणारे सर्व सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे.
  • पुणे -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता पहिली तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा आणि भाजपच्या पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी आज वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणासंबंधी पहिला तक्रार अर्ज दाखल केला. तत्पुर्वी भाजप युवा मोर्चाच्या वतीने वानवडी पोलीस स्टेशन समोर मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात, तसेच राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मुंबई -जीएसटी कायद्यातील जाचक त्रुटी आणि ई-वे बिलविरोधात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स (कॅट) या व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेने आज (26 फेब्रुवारी) देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईतील माल वाहतुकीसह व्यापारी बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह राज्यातील 10 लाख वाहनांचा चक्काजाम होणार आहे.

  • मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ॲन्टीलिया घराबाहेर सापडलेल्या बेवारस स्कॉर्पियो गाडीमध्ये 25 एमएम 125 ग्रॅमच्या जिलेटीनच्या 20 कांड्या मिळून आल्या आहेत. सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड बाजारगाव नागपूर असा पत्ता असलेल्या या जिलेटीनच्या काड्या असून स्कॉर्पिओ गाडीची नंबर प्लेटही बनावट असल्याचे समोर आले आहे. ही गाडी चोरीची असल्याचे आतापर्यंतच्या पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. हे चे सर्व साहित्य मुंबई इंडियन्स नाव असलेल्या बॅगेमध्ये ठेवण्यात आले होत, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
  • महाभारतातील सहावा पांडव म्हणजे कर्ण. तो तसा दुर्लक्षितच राहिला. अर्जुनाएवढीच गुणवत्ता असूनही त्याचा उदोउदो कधी झाला नाही. महाभारत हे महाकाव्य अनेकांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावर, चितारण्याचा प्रयत्न केला. भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय फिल्म मेकर्सनी महाभारत आपापल्यापरीने उभं केले. परंतु कर्णाला पृष्ठभागी ठेऊन कोणतीही कलाकृती झाल्याचे ऐकिवात नाही. आता निर्माते वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख आणि जॅकी भगनानी यांनी हे 'कर्ण-धनुष्य' उचलण्याचे ठरविले आहे. सूर्यपुत्र कर्णाला मध्यवर्ती भूमिकेत ठेऊन ते सूर्यपुत्र महावीर कर्ण चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल तसेच विषयाचे बारकावे आणि अप्रतिम दृष्यमानाता या चित्रपटाची खासियत असेल. भारतीय सिनेमात प्रथमच महाभारताची भव्यता प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.
  • नवी दिल्ली -भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज विनय कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. आज शुक्रवारी २६ फेब्रुवारी २०२१ रोजी विनय कुमारने आपली १७ वर्षांची क्रिकेट कारकीर्द संपविण्याची घोषणा केली. भारताकडून एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० सामने खेळणार्‍या या गोलंदाजाने आपल्या कारकीर्दीत ९००हून अधिक बळी घेतले. यात त्याच्या प्रथम श्रेणीतील ५०४ बळींचा समावेश आहे.
Last Updated : Sep 13, 2021, 11:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details