नाशिक - जिल्ह्यात 25 दिवसाच्या मिनी लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. शासन निर्णयानंतर सर्व दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे इतर उद्योगधंदे, सार्वजनिक वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर 40 टक्के वर्दळ दिसून येत आहे. सविस्तर वाचा..
मुंबई -सीआरपीएफच्या कार्यालयांमध्ये अज्ञात व्यक्तीकडून धमकी देणारा मेल पाठविण्यात आला असून, या ईमेलच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी मंदिरे व विमानतळावर बॉम्ब ब्लास्ट घडविण्याची धमकी देण्यात आली आहे. हा मेल 4 ते 5 दिवसांपूर्वी आल्याचे सीआरपीएफच्या सूत्रांकडून कळत आहे. सविस्तर वाचा..
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय, असा प्रश्न सध्या अनेकांना पडल्याची खोचक टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. राज्य सरकारवर एकापाठोपाठ होणाऱ्या आरोपासंदर्भात विचारणा करण्यात आली असता राज ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तरं दिली. सविस्तर वााचा..
अमरावती - जिल्ह्याचे तापमान 41 अंशाच्या समोर गेले आहे. वाढत्या तापमानामुळे अमरवतीकरांचा जीव मेटाकूटीला आला आहे. मात्र, अमरावतीमधील कामगार कल्याण कार्यलयात विदारक चित्र पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील हजारो कामगार नोंदणीसाठी या कार्यालयात येत आहेत. मात्र, भर उन्हात ताटकळत उभ्या असणाऱ्या या कामगारांसाठी सावली सोडाच पण पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे कामाच्या अपेक्षेने आलेल्या या कामगारांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. सविस्तर वाचा..
नागपूर - शहरात वाढत्या कोरोना रुग्णांवर आळा घालण्यासाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. या दरम्यान रात्री ८ वाजल्यापासून शहरातील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र, या आदेशाला नागपूरातील व्यापारी वर्गाने विरोध दर्शवला आहे. नागपूर शहरातील मुख्य भाग असलेल्या इतवारी चौकात व्यापारी वर्गाने रसत्यावर उतरत दुकाने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा..