महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @  1 PM
Top 10 @ 1 PM

By

Published : Jun 29, 2021, 6:47 AM IST

Updated : Jun 29, 2021, 12:56 PM IST

  1. मुंबई - मुंबईतील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मुंबई तिसऱ्या लाटेला सामोरे जात असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. ही समाधानकारक बाब असून यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण कमी प्रमाणात होऊ शकते, अशी शक्यता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केली आहे. तसेच ज्यांना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी असल्याचेही काकाणी यांनी सांगितले. सविस्तर वाचा..
  2. मुंबई - राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे लक्षण पाहता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज जिल्हा प्रशासन आणि महापालिका आयुक्तांची आढावा बैठक बोलावली. दुरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक झाली. लाट रोखण्यासाठी आरोग्यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्मितीवर भर द्यावा, अशा सूचना मुख्य सचिवांनी केल्या. सविस्तर वाचा..
  3. मुंबई - राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे लक्षण पाहता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज जिल्हा प्रशासन आणि महापालिका आयुक्तांची आढावा बैठक बोलावली. दुरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक झाली. लाट रोखण्यासाठी आरोग्यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्मितीवर भर द्यावा, अशा सूचना मुख्य सचिवांनी केल्या. सविस्तर वाचा..
  4. जळगाव -कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे पुन्हा संकट उभे राहिले आहे. त्यामुळे, खबरदारी म्हणून जिल्ह्यात नव्याने निर्बंध घालण्यात आले आहेत. आता यापुढे 'नॉन इसेन्सियल' सेवांसाठी सोमवार ते शुक्रवार दरम्यान दुपारी 4 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी म्हणजेच, शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन असणार आहे. या काळात नॉन इसेन्सियल सेवा पूर्णपणे बंद असतील. अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल दुकाने व वैद्यकीय सेवा वगळता इतर दुकाने देखील 4 वाजेपर्यंत सुरू असतील. दरम्यान, नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेची 6 पथके तैनात असणार आहेत. या शिवाय पोलीस प्रशासन देखील दंडात्मक कारवाई करणार आहे. सविस्तर वाचा..
  5. पाटणा - देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढत असताना अनेक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. पण, बिहारमधील सामाजिक कार्यकर्त्याने केवळ नाराजी व्यक्त केली नाही. तर थेट न्यायालयात धाव घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते तमन्नाह हाश्मी यांनी केंद्रीय पेट्रोलिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात मुझफ्फरपूर न्यायालयात तक्रार केली आहे. देशात इंधनाचे दर वाढत असल्याने ही तक्रार हाश्मी यांनी नोंदविली आहे.सविस्तर वाचा..
  6. मुंबई - राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली असताना, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यामुळे उलट-सुलट चर्चांना यामुळे उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांना मी सतत भेटत असतो. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही संभ्रमावस्था नाही. हे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा ठाम विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा..
  7. नवी दिल्ली- ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये विविध मुद्द्यावरून तणावाची स्थिती असताना त्यात नव्याने भर पडली आहे. देशात कोट्यवधी वापरकर्ते असलेल्या ट्विटरने कंपनीच्या वेबसाईटवर चक्क भारताचा चुकीचा नकाशा दाखविला आहे. या नकाशामध्ये भारतापासून जम्मू आणि लडाख हे स्वतंत्र देश दाखविले आहेत. सविस्तर वाचा..
  8. नवी दिल्ली - जगभरातील ५० हून अधिक देशांनी कोविनच्या यंत्रणेत तयारी दाखविल्याची आहे. ही माहिती भारत ओपन सोर्स सॉफ्टवेअरमधून मोफत देणार आहे. ते सीसीआयआयच्या दुसऱ्या सार्वजनिक आरोग्य परिषद -२०२१ मध्ये बोलत होते. सविस्तर वाचा..
  9. मुंबई - उशिरानं का होईना पण कंगना रणौतचा चित्रिकरणासाठी परदेशवारीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत. कंगना रणौतची पासपोर्ट नूतनीकरणासाठीची याचिका मुंबई उच्च न्यायालयकडून आज सोमवारी निकाली काढण्यात आली. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. सविस्तर वाचा..
  10. कोलंबो -शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. भारताचा प्रमुख संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. यामुळे बीसीसीआयने दुसऱ्या फळीतील खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यावर पाठवले आहे. या संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी भारताचा महान खेळाडू राहुल द्रविड याच्याकडे सोपवण्यात आली आहे.सविस्तर वाचा..
Last Updated : Jun 29, 2021, 12:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details