मुंबई -ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हे भाजपाचे पाप असून फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच ओबीसी समाजाला चार महिन्यात आरक्षण देईन, अन्यथा राजकारणाचा संन्यास घेईन, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा करणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा सवालही देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. सविस्तर वाचा..
नांदेड - सत्तेत आल्यानंतर चार महिन्यांत ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाचा प्रश्न सोडवू, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर जयंत पाटील यांनी नांदेडमध्ये प्रत्युत्तर दिले. ओबीसींचा कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवाल, ते सांगा, आम्ही सोडवू, त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही. कारण जनतेने तुम्हाला नाकारले आहे, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला. ते नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सविस्तर वाचा..
नाशिक - इगतपुरीमध्ये पोलिसांनी रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहितीवरून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी छापा टाकत तब्बल 22 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये काही महिला फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या तर 1 महिला बिग बॉस या शोमध्ये काम केलेली असल्याचे समजते.सविस्तर वाचा..
मुंबई- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासली होती. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महापालिकेने ‘ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लांटमधील ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे विविध रुग्णालयांना ऑक्सिजनची गरज भासल्यास विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठा करणे सुलभ होणार आहे. त्यासाठी पालिका २१ कोटी रुपये खर्च करणार आहे.सविस्तर वाचा..
मुंबई- मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी तो पूर्णपणे गेलेला नाही. तसेच राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने नवीन परिपत्रक काढले आहे. त्यानुसार मुंबईतही सोमवारपासून (दि. २८ जून) तिसऱ्या स्थराचे निर्बंध लागू राहतील, असे परिपत्रक पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी काढले आहे. यामुळे दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार असून ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू असणार आहे. दरम्यान, हे निर्बंध अधिक कडक केले जाऊ शकतात, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सविस्तर वाचा..