मुंबई - कोरोनाचे नवे नवे व्हेरीएन्ट जगभरात आढळत असून आता डेल्टा प्लस व्हेरीएन्टने जगाची चिंता वाढवली आहे. तर राज्यात या व्हेरीएन्टचे 21 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातही चिंतेचे वातावरण आहे. महत्त्वाचे म्हणजे या व्हेरिएन्टवर लस आणि अँटिबॉडीज काम करत नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात असल्याने या चिंतेत आणखी भर पडली आहे. सविस्तर वाचा..
नवी मुंबई (ठाणे) -येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर दी बा. पाटील यांचे नाव द्यावे म्हणून सर्व भूमिपुत्र एकवटले आहेत. 10 जूनला या भूमिपुत्रांच्या माध्यमातून साखळी आंदोलन केले गेले होते. येत्या 24 जूनला देखील नवी मुंबई परिसरातील भूमिपुत्र या नामकरणाविषयी आंदोलन छेडणार आहेत. मात्र, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही हक्कासाठी न्यायासाठी आंदोलन करणार, असा पवित्रा भूमिपुत्रांनी घेतला आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पाच जुलैपासून सुरू होणार आहे. कोरोनाचे संकट आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांत गुंडाळण्यात येणार आहे. राज्य विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांच्या अधिवेशनावर विरोधकांनी जोरदार टीका करत सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला. सविस्तर वाचा..
पुणे -ग्रामीण पोलीस दलात कार्यरत एका पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. रज्जाक महंमद मणेरी असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. तो मुळचा इंदापूर तालुक्यातील रहिवासी असून सध्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याने नस कापून आणि गळफास घेऊन स्वतःचा जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने 'सॉरी मॉम' असे चिठ्ठीत लिहून ठेवले होते. सविस्तर वाचा..
मुंबई -गेले दीड वर्ष रखडलेल्या देवस्थान आणि महामंडळाच्या वाटपास महाविकास आघाडीच्या समन्वय समितीने आज मंजुरी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत शिर्डी देवस्थान राष्ट्रवादी तर पंढरपूर देवस्थान काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील सिद्धिविनायक देवस्थानाचे अध्यक्षपदा शिवसेनेकडे कायम राहील, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नियुक्त्यांबाबतचे अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा..
भंडारा- शासकीय अधिकार द्या 3 महिन्यात राजकीय आरक्षण पूर्वरत करून देऊ, असे खळबळजनक वक्तव्य भाजपा नेते आणि ओबीसी खात्याचे माजी कॅबिनेट मंत्री संजय कुटे यांनी केले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते मंगळवारी भंडाऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सविस्तर वाचा..
मुंबई- मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. योग दिनाचे औचित्य साधून सोमवारपासून ( 21 जून) 30 ते 44 वयोगटातील लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाला या वयोगटातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने दिवसभरात सोमवारी 1 लाख 8 हजार 148 लसीचे डोस देण्यात आले होते. मंगळवारी (दि. 22 जून) सलग दुसऱ्या दिवशी 1 लाख 13 हजार 135 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 46 लाख 84 हजार 50 लसीचे डोस देण्यात आले आहेत. सविस्तर वाचा..
रायपूर (छत्तीसगढ) - बस्तर जिल्ह्याच्या पखनार परिसरात नक्षलवाद्यांनी गोपनीय सैनिकाची गळा चिरुन हत्या केली. बुधराम (रा. पखरार), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गावातील आढवडी बाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी काही नक्षली तेथे पोहोचले आणि बुधराम यांचा खून केला. पखनार पोलिसांनी अज्ञात नक्षलवाद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती बस्तरचे पोलीस अधीक्षक दीपक झा यांनी दिली आहे.सविस्तर वाचा..
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालायाने १२ वीच्या सीबीएसई व आयसीएसईच्या परीक्षांच्या मुल्यांकनावर आक्षेप घेणारी याचिका फेटाळली आहे. दोन्ही बोर्डाच्या निर्णयाला विद्यार्थी पाठिंबा देत आहेत. अशा स्थितीत बोर्डाचे निर्णय योग्य आणि सयुक्तिक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे. सविस्तर वाचा..
साउथम्पटन -जागतीक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम लढतीच्या पाचव्या दिवसाखेर भारताने न्यूझीलंडसमोर ३२ धावांची आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी मोहम्मद शमी आणि इशांत शर्माच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचा पहिला डाव ९९.२ षटकात २४९ धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद शमीच्या घातक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाहीत. त्याने चार बळी घेतले तर दीडशेहून जास्त चेंडू खेळणाऱ्या केन विल्यमसनने ४९ धावा करत संघाला आघाडी मिळवून दिली. भारताने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली असून संघाने ३० षटकांत २ बाद ६४ अशी धावसंख्या उभारली आहे. बुधवारी (दि. २३ जून) राखीव दिवसाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेता कोण असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. सविस्तर वाचा..
सविस्तर बातम्यांसाठी येथे क्लिक करा...