महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @  1 PM
Top 10 @ 1 PM

By

Published : Jun 22, 2021, 7:00 AM IST

Updated : Jun 22, 2021, 1:23 PM IST

  1. नवी दिल्ली -निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यापूर्वीही दोघांची शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट झाली होती. आता पुन्हा दोघांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ असून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. आगामी उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणूक आणि 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. दरम्यान, उद्या (मंगळवार) दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत शरद पवार बैठक घेणार आहेत. यात सध्याची राजकीय आणि आर्थिक स्थितीवर सर्वांगिण चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीला मनिष तिवारी आणि शत्रुघ्न सिन्हा उपस्थित राहण्याची शक्यता नाही. खासगी कामामुळे बैठकीला उपस्थित राहता येणार नाही, असे त्यांनी कळविल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सविस्तर वाचा...
  2. मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. योग दिनाचे औचित्य साधून सोमवार 21 जून पासून 30 ते 44 वयोगटातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. लसीकरणाला या वयोगटातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने दिवसभरात 1 लाख 8 हजार 148 लसीचे डोस देण्यात आले. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 45 लाख 70 हजार 915 लसीचे डोस देण्यात आले आहेत. बहुतेक लोकांचे नंबर न आल्याने लस न घेताच त्यांना घरी परतावे लागले. सविस्तर वाचा..
  3. पुणे - प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि उद्योगपती अविनाश भोसले यांची तब्बल 40 कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. अविनाश भोसले यांची काही दिवसांपूर्वीच मुंबईतील कार्यालयात चौकशी केली होती. त्यानंतर त्यांच्या पुण्यातील घरी छापेमारी देखील करण्यात आली होती. त्यानंतर भोसले यांच्या पुणे, नागपूर आणि गोवा येथील मालमत्ता जप्त करण्यात आल्या. विदेशी विनियम व्यवस्थापन कायदा 1999 (फेमा) कलम उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
  4. नागपूर -एकाच कुटुंबातील पाच सदस्यांची चाकूने भोकसून हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः आत्महत्या केल्याच्या घटनेने आज संपूर्ण नागपूरसह राज्य हादरून गेले आहे. आरोपी आलोक माटूरकर याने अतिशय थंड डोक्याने हे षडयंत्र रचले होते. याचा खुलासा तपासादरम्यान झाला आहे. काही दिवसांपूर्वी मेहूणीसोबत झालेल्या वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने आरोपीने स्वतःच्या कुटुंबाला का संपवले, या बाबीचा खुलासा होऊ शकलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपी आलोकच्या नातेवाईकांकडे चौकशी करून काही सुगावा मिळतो का, याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी मृतक आरोपी आलोकच्या घरातूनच चाकू जप्त केला आहे. सविस्तर वाचा..
  5. मुंबई -गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. राज्यात सोमवारी नव्या 6,270 कोरोना रुग्णांची भर पडली असून 94 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी 13758 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सद्यस्थिती 124398 सक्रिय रुग्ण असून 57,33,215 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.89 टक्के एवढा आहे. तर राज्यात आतापर्यंत 1,18,313 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा..
  6. कर्जत (रायगड) -उल्हास नदीपात्रात वाहून गेलेल्या मुबंई येथील तरुणाचा मृतदेह सोमवारी (21 जून) पोलिसांना सापडला. 20 जूनला उशिरापर्यंत स्थानिकांच्या मदतीने नेरळ पोलिसांनी उल्हास नदीपात्रात तरुणाचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. सोमवारी या तरुणाचा बुडालेल्या ठिकाणाहून काही अंतरावर मृतदेह पाण्यावर तरंगताना सापडला. समीर देवळेकर, असे मृत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वाचा..
  7. नवी दिल्ली -निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यापूर्वीही दोघांची शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट झाली होती. पुन्हा दोघांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ असून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. आगामी उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणूक आणि 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. दरम्यान, आज (मंगळवार) दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत शरद पवार बैठक घेणार आहेत. यात सध्याची राजकीय आणि आर्थिक स्थितीवर सर्वांगिण चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीला मनिष तिवारी आणि शत्रुघ्न सिन्हा उपस्थित राहण्याची शक्यता नाही. खासगी कामामुळे बैठकीला उपस्थित राहता येणार नाही, असे त्यांनी कळविल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सविस्तर वाचा..
  8. नवी दिल्ली -राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष (निवृत्त न्यायाधीश) अरुण मिश्रा यांनी निवडणुकीनंतर झालेल्या पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या माजी अध्यक्षांनी इंटेल ब्युरोचे माजी अध्यक्ष राजीव जैन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. सविस्तर वाचा..
  9. लखनौ (उत्तर प्रदेश) - गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना २४ जून रोजी लोणी सीमेच्या पोलीस स्थानकात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वृद्धाला मारहाण झालेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात लोणी पोलिसांना चौकशी करायची आहे. सविस्तर वाचा..
  10. साउथम्पटन - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा चौथा दिवस पावसामुळे वाया गेला आहे. आज एकही चेंडू खेळवला गेला नाही. तब्बल पाच तास खेळ सुरू होण्याची वाट पाहण्यात आली, पण पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेंमीची निराशा झाली आहे.सविस्तर वाचा..
Last Updated : Jun 22, 2021, 1:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details