महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news stories around the globel
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...

By

Published : Jun 19, 2021, 3:07 PM IST

Updated : Jun 19, 2021, 10:49 PM IST

  • नवी दिल्ली- महाराष्ट्र टास्क फोर्सने कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिल्यानंतर एम्सनेही हा तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. जर कोरोनाच्या काळात योग्य नियमांचे पालन करणे व गर्दी टाळणे नाही केल्यास कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे. येत्या सहा ते आठ आठवड्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा इशारा एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी दिला आहे. वाचा सविस्तर
  • मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला गेला होता. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसं जाहीर वक्तव्यसुद्धा माध्यमांमध्ये केलं होतं. या स्वबळावर निवडणुका लढण्याच्या नाऱ्यावरुन आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाला आपल्या भाषणात टोला लगावला आहे. वाचा सविस्तर
  • पुणे -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नेहेमी कोरोनाच्या नियमाबाबत कडक अंमलबजावणी वेळोवेळी पाहायला मिळते. नाहीतर अजित पवार आपल्याच शैलीत समोरच्या व्यक्तीला उत्तर देताना अनेक उदाहरणे आपण पहिलेच आहे. मात्र, आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसली. वाचा सविस्तर
  • नवी दिल्ली -केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची चर्चा सुरू आहे. कारण, गेल्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमधील आघाडीच्या नेत्यांसह मंत्र्यांच्या दोन बैठकी घेतल्या आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान आणि कर्नाटकचे भाजपचे नेते सुरेश अनगडी यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्याने रिक्त झालेल्या मंत्र्यांच्या जागा सरकारला भराव्या लागणार आहेत. वाचा सविस्तर
  • बंगळुरू - यंदाही कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसू नये, यासाठी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे ५० मिनिटे चालली. या बैठकीत पुरनियंत्रणाकरिता समन्वयाने काम करण्याची दोन्ही राज्यांनी सहमती दर्शविली आहे. वाचा सविस्तर
  • नवी दिल्ली -केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची चर्चा सुरू आहे. कारण, गेल्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमधील आघाडीच्या नेत्यांसह मंत्र्यांच्या दोन बैठकी घेतल्या आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान आणि कर्नाटकचे भाजपचे नेते सुरेश अनगडी यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्याने रिक्त झालेल्या मंत्र्यांच्या जागा सरकारला भराव्या लागणार आहेत. वाचा सविस्तर
  • मुंबई -उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील जिलेटीन स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जात आहे. यात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केल्यानंतर यामध्ये आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींमध्ये प्रदीप शर्मा व सचिन वाझे हे दोघे यात कट रचणारे असू शकतात, अशा एनआयएच्या सूत्रांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
  • लखनऊ - दोन बायका आणि एक नवरा, त्या दोघींमध्ये नवऱ्याचे होणारे हाल आपण चित्रपटात पाहिले असतीलच. पण प्रत्यक्षात असं नातं असतं तेव्हा काय होतं? उत्तर प्रदेशच्या रामपुरमध्ये अशीच रंजक घटना समोर आली आहे. एका पतीला त्याच्या दोन पत्नींमध्ये रीतसर वाटलं गेलं आहे. पतीला आठवड्यात 3-3 दिवस आपल्या दोन्ही पत्नींसोबत राहावं लागणार आहे. खरं तर हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावरुन जडलेल्या प्रेमामुळे झालं आहे. वाचा सविस्तर
  • मुंबई -जेव्हा शिवसेनेची स्थापना झाले त्या वेळेला लोक म्हणत होती की शिवसेना मुंबई ठाण्याच्या पुढे जाणार नाही. मात्र, महाराष्ट्राच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहोचली. मराठी माणसाचा विषय शिवसेनेने कधीच दूर होऊ दिला नाही. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला शिवसेना आपली वाटते. हिंदुत्त्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे आहेत, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचा आज (शनिवारी) 55वा वर्धापन दिवस आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. वाचा सविस्तर
  • सिंधुदुर्ग - शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांना १०० रुपयात दोन लिटर पेट्रोल देण्याची घोषणा करत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ मध्ये लक्ष्मी नारायण पेट्रोल पंपावर पेट्रोल वाटपाला सुरुवात केली. या वेळी भाजपा नेते नारायण राणे यांच्या पेट्रोल पंपासमोर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा वाद थोडक्यात शमला आहे. वाचा सविस्तर
Last Updated : Jun 19, 2021, 10:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details