महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @  1 PM
Top 10 @ 1 PM

By

Published : Jun 19, 2021, 6:57 AM IST

Updated : Jun 19, 2021, 12:52 PM IST

  1. नवी दिल्ली-भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना चंदीगड येथे दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नीचेही कोरोनामुळे निधन झाले होते. सविस्तर वाचा..
  2. मुंबई - शिवसेनेचा शनिवारी 55वा वर्धापनदिन आहे. दरवर्षी हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा होतो. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे वर्धापनदिनाचा कार्यक्रम परंपरेप्रमाणे करता आला नाही. यंदाही दुसरी लाट धडकली. ती शांत होत असली तरी पुन्हा उसळू नये म्हणून गर्दी टाळण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. कोरोनाने श्वास घेणे कठीण केले असले तरी श्वासाश्वासात शिवसेना आहे. शिवसेना 55 वर्धापनदिन सोहळा होणार नाही. तरी कोरोनाशी दोन हात करण्यात यशस्वी ठरलेले शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या वर्षीप्रमाणेच वर्धापनदिनानिमित्त शिवसैनिकांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.सविस्तर वाचा..
  3. मुंबईत सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यात तुफान राडा झाल्याचा प्रकार बुधवारी (16 जून) घडला. राम मंदिराच्या जमीन खरेदीदरम्यान भ्रष्टाचार करण्यात आल्याची टीका शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात करण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. सविस्तर वाचा..
  4. अमरावती -माजी राज्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्यातील दमदार नेता अशी ओळख असणारे डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेसबाहेर एक तप घालवून शनिवारी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सविस्तर वाचा..
  5. मुंबई- मागील २४ तासांमध्ये राज्यभरात १४ हजार ३४७ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ९ हजार ७९८ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, १९८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,९९,९८३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.७३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के एवढा आहे.सविस्तर वाचा..
  6. मुंबई -राज्यात ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाकडून लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित करण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
  7. औरंगाबाद- शाळा शुल्क वसुलीसाठी बंद करण्यात आलेली ऑनलाईन शिक्षणाची लिंक सुरु करा. शुल्काअभावी राखून ठेवलेला वार्षिक निकाल द्या. अशी मागणी शहानुरमियाॅं दर्गा परिसरातील जैन इंटरनॅशनल शाळेच्या प्रशासनाकडे पालकांनी केली. पालक आणि शाळा प्रशासनात शुक्रवारी शाब्दीक वाद झाल्याने पोलीसांना बोलविण्यात आले होते. सविस्तर वाचा..
  8. मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या जिलेटीन स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जात आहे. तपासादरम्यान टप्प्याटप्प्याने एकेक प्रकरणाचा खुलासा केला जात आहे. आतापर्यंत 10 जणांना याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. मुंबई पोलीस खात्यात एकेकाळी एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि तेवढेच विवादात राहिलेल्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह 10 आरोपींना या स्फोटक प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. अँटिलिया इमारतीच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांच्या संदर्भातील तपासाचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा हा विशेष वृत्तांत... सविस्तर वाचा..
  9. मुंबई - महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर हा शिवसेनेचा दुसरा वर्धापन दिन आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन. दोन वर्षात राम मंदिर, हिंदुत्वाचा मुद्दा, कोरोना, मराठा आरक्षण, सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण, पोलीस निरीक्षक सचिन वाजे खंडणी प्रकरण, विरोधकांकडून सतत सुरू असलेले भ्रष्ट्राचाराचे आरोप या सारख्या विविध खाच खळग्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जावे लागले. एका आक्रमक पक्षाचा पक्षप्रमुख असतानाही त्यांनी तोल जाऊ न देता, सक्षमपणे मुख्यमंत्री पद भूषवत आहेत. तेही कोणताही प्रशासकीय सेवेचा अनुभव नसताना. आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने ई टीव्ही भारतने टाकलेला दृष्टिक्षेप.. सविस्तर वाचा..
  10. हैदराबाद - 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर युट्युबर गौरव वासन याने प्रतिक्रिया दिली आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना गौरव वासन म्हणाले की, मागील वेळी त्यांना भेटलो तेव्हा ते चांगले होते. गेल्या वर्षी त्यांनी जे काही म्हटले होते, त्याबद्दल त्यांनी वारंवार माफी मागितली होती. सविस्तर वाचा..
Last Updated : Jun 19, 2021, 12:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details