- मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एनआयएने गुरुवारी (१७ जून) मुंबई पोलिसांतील माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह तीन जणांना अटक केली आहे. त्यानंतर आज (गुरुवार) प्रदीप शर्मा यांना एनआयएच्या विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एनआयएकडून आज सकाळी 6 च्या सुमारास प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील जे. बी. नगर निवास स्थानी छापेमारी करण्यात आली. ही छापेमारी जवळपास 4 ते 5 तास चालली. यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई- मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या वतीने २०१७ पासून मूक आंदोलने सुरू आहेत. ५७ मूक अंदोलनाच्या माध्यमातून गेले ३ वर्ष मराठा आरक्षणाची मागणी केली जात आहे. परंतू हा प्रश्न अजून ही प्रलंबीत आहे. मराठा मूक अंदोलनाची पुढील दिशा २१ जूनला समन्वयकांशी चर्चा करून ठरवणार असल्याची, माहिती खासदार संभाजीराजे भोसले यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे भोसले यांच्यात गुरुवारी महत्वपूर्ण बैठक झाली. तब्बल दीड तास झालेल्या बैठकीत राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे संभाजीराजे यांनी सांगीतले. सविस्तर वाचा..
- मुंबई- मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांची पत्रकार परिषद झाली. मराठा समाज आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्याचे यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत याबाबत चर्चा झाली. यावेळी रिव्ह्यू पिटीशन फाइल करण्याची मागणी करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. त्या लक्षात घेऊन तातडीने रिव्ह्यू पिटीशन दाखल करू, असे यावेळी सांगण्यात आल्याचे संभाजीराजे म्हणाले. सविस्तर वाचा..
- मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भातील प्रमुख सहा मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यापैकी २३ जिल्ह्यात वसतिगृह उपलब्ध करून देण्याची जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही सुरू झाल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यातील बैठक संपल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी ते बोलत होते. सविस्तर वाचा..
- पिंपरी-चिंचवड (पुणे) -पिंपरी-चिंचवडमधील 77 वर्षीय आजोबांनी चक्क देश भ्रमंती केली असून सर्वच शक्तीपीठांच दर्शन घेतले आहे. विश्वास गोविंद कुलकर्णी असे या आजोबांचे नाव आहे. विश्वास यांना लहानपणापासूनच फिरण्याची आवड आहे. मात्र, देशभर फिरून शक्तीपीठांचे दर्शन घ्यायचे असे त्यांनी खूप अगोदर ठरवले होते. हृदयाची शस्त्रक्रिया झालेली असताना देखील त्यांनी ही किमया केली असून तीन महिन्यात तब्बल 19 हजार किलोमीटर अंतर कापून आपली ध्येयपूर्ती केली आहे. सविस्तर वाचा..
- झज्जर- (हरियाणा) झज्जर जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीच्या डॉक्टरांनी सात वर्षाच्या बालकाला मृत घोषित करून त्याला घरी परत पाठविलेले होते. परंतू हा सात वर्षांचा मुलगा आज जिवंत आहे. जर निरागस आज्जीने नातवाचे तोंड पहाण्याचा आग्रह धरला नसता आणि आईने मुलाच्या जिवंत होण्याची आशा सोडली असती तर कदाचित आज हा मुलगा जिवंत नसता. सविस्तर वाचा..
- मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अटकेत असलेला सिद्धार्थ पिठानी याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, त्याला 2 जुलैला सरेंडर व्हावं लागणार आहे. लग्नाचं कारण देत सिद्धार्थ पिठाणीच्या वकिलाने अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. यावर कोर्टाने सिद्धार्थला दहा दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.सविस्तर वाचा..
- बहादूरगड- हरियाणाच्या बहादूरगडमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातून एक वेदनादायक बातमी समोर आली आहे. चळवळीच्या ठिकाणी एका व्यक्तीला जिवंत जाळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बहादूरगडमधील कासार गावात राहणारा मुकेश असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुकेश याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण तो जवळजवळ 90 टक्के जळाला होता. सविस्तर वाचा..
- रायगड -विशाखापट्टणम येथील वायझॅक बंदरातून साळव येथील जेएसडब्ल्यू कंपनीत लोखंडाचा कच्चा माल घेऊन येणारी बार्ज गुरुवारी 17 मे रोजी रेवदंडा बंदरात बुडाली. भरतीचे पाणी बार्जमध्ये घुसल्याने हा अपघात झाला. या बार्जमध्ये 16 खलाशी अडकून पडले होते. यापैकी 13 खलाशांना तटरक्षक दलाच्या जवानांनी चेतक या दोन हेलिकॉप्टरच्या साहाय्याने, तर तीन जणांना बोटीच्या साहाय्याने वाचवण्यात आले. हे रेस्क्यू ऑपरेशन सुमारे तीन तास सुरू होते. तटरक्षक दल, पोलीस, महाराष्ट्र मेरिटाईम विभाग, महसूल यांनी हे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन केले. एम.व्ही. मंगलम, असे या बार्जचे नाव आहे. सविस्तर वाचा..
- साउथम्पटन - भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आपल्या ११ शिलेदारांची निवड केली आहे. सामन्याच्या एक दिवस आधीच भारताने आपला अंतिम संघ निवडला आहे. बीसीसीआयने अंतिम संघाची घोषणा ट्विटच्या माध्यमातून केली. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 1 PM
Last Updated : Jun 18, 2021, 1:24 PM IST