- नाशिक : शहरातील अनेक रुग्णालये पालथी घालूनही दोन कोरोना रुग्णांना बेड मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले होतं. मात्र यातील एका रुग्णाचा बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला आंदोलनात घेऊन येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा...
- दिल्ली - चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारतर्फे दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. गुरूवारी सकाळी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्याची घोषणा केली. सविस्तर वाचा...
- मुंबई - पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि आसाममध्ये निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने आपली सर्व ताकद लावली आहे. मात्र, ममता बॅनर्जी या बंगालच्या वाघिण आहेत आणि त्या एकट्याच सर्वांना पुरून उरतील, अशी खात्री राऊत यांनी व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - ज्येष्ठ संगीतकार-गायक बप्पी लाहिरी यांना “सौम्य कोविड” ची लक्षणे आढळून आल्यानंतर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांची मुलगी आणि गायिका रेमा लाहिरी बन्सल यांनी सांगितली. त्यांच्या प्रवक्त्याने बुधवारी रात्री उशिरा दिलेल्या निवेदनात बप्पी लाहिरी यांना खबरदारीचा उपाय म्हणून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असल्याचे म्हटले आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई -एनआयए मागील अनेक दिवसांपासून ज्या ऑडी कारचा शोध घेत होती तिची ओळख पटली आहे. या कारमध्येच विनायक शिंदे आणि सचिन वाझे दिसत आहेत. एका टोलनाक्यावरील हा सीसीटीवी फुटेज असून ही कार सध्या वसईत असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार एनआयएची एक टीम वसई आणि आसपासच्या परिसरात या गाडीचा शोध घेत आहे. ईटीव्ही भारतच्या हाती सीसीटीव्ही फुटेजचा फोटो लागला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विनायक शिंदे आणि सचिन वाझे दिसत आहेत. मात्र, हा सीसीटीव्ही अस्पष्ट आहे. सध्या एनआयए अनेक टोल नाक्यावरचे फुटेज खंगाळत असून ठोस पुरावे गोळा करण्यासाठी युद्धपातळीवर शोध सुरू आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई- मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्णसंख्या कमी होत होती. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग तीन दिवस तीन हजारावर, त्यानंतर सलग तीन दिवस पाच हजारावर तर दोन दिवस 6 हजाराच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसात रुग्णसंख्या घटली होती. बुधवारी (दि. 31 मार्च) पुन्हा त्यात वाढ झाली आहे. 5 हजार 394 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा...
- कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम मतदारसंघातील मतदान याच टप्प्यात होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे खास लक्ष असणार आहे. सविस्तर वाचा...
- दिसपूर :आसाममधील विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. २७ मार्चला पार पडलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये ७६.८९ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. आज एकूण ३९ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल. सुमारे ७३ लाख मतदार ३४५ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतील. सविस्तर वाचा...
- नवी दिल्ली :केंद्र सरकारने बुधवारी छोट्या बचत योजनांचे व्याजदर कमी करण्यात आल्याचा आदेश जारी केला होता. मात्र हा आदेश चुकून जारी करण्यात आला असून, तो लवकरात लवकर मागे घेण्यात येईल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई- मुंबईत सध्या तिसऱ्या टप्प्यातील 40 लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. मात्र, उद्दिष्टापेक्षा कमी लसीकरण झाल्याने पालिकेने आज म्हणजे 1 एप्रिलपासून सकाळी 7 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 9 अशा दोन सत्रात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन सत्रात लसीकरण करून उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. सविस्तर वाचा...
Top 10 @ 1 PM दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - Aasam election news
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
संपादित छायाचित्र
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा...
Last Updated : Apr 1, 2021, 1:41 PM IST