महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

टॉप ११
टॉप ११

By

Published : Jun 20, 2021, 3:19 PM IST

Updated : Jun 20, 2021, 11:03 PM IST

  1. पुणे -विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. हे पत्र म्हणजे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही सध्या सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. भाजपा विधानसभेच्या निवडणुकीत सिंगल लारजेस्ट पार्टी होती, मात्र बहुमत नसल्याने विरोधी पक्षात बसलो आहोत. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ, असं फडणवीस यांनी म्हटले आहे. ते पुण्यात बोलत होते. सविस्तर वाचा...
  2. मुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरण अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींची डीएनएन चाचणी करण्यात आली. त्याकरीत एक टीम एनआयए कार्यालयात पोहोचली होती. एनआयएकडे असलेले पुरावे आणि आरोपींचे डीएनए चाचणी तपासली जाणार आहे.सविस्तर वाचा...
  3. मुंबई -शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरनाईक यांच्या पत्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचे नमूद आहे. हा आरोप गंभीर असून सर्वांनी त्याचा अभ्यास करावा, असे राऊत यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा...
  4. पुणे -कुठल्याही प्रकरणात आम्ही काहीही सकारात्मक म्हटले कि सामनाच्या अग्रलेखातून टिका होते, कि यांची सत्ता नाही म्हणून यांच्या पोटात दुखत आहे. प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे आणि जर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विनंतीचा विचार केला तर आमचे नेतेही विचार करतील, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर दिली आहे. सविस्तर वाचा...
  5. मुंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र हे शिवसेनेच्या अंतर्गत आणि महाविकासआघाडीच्या अंतर्गत नेमके काय चालले हे दाखवणारे पत्र आहे. शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. तसेच तळागाळातल्या शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे, हे यामधून स्पष्ट दिसत असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. सविस्तर वाचा...
  6. मुंबई -राज्यातील विदर्भ वगळता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 15 जून 2021 पासून सुरू करण्यात आले आहे. शाळा प्रवेशासाठी आणि शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर दहावीच्या निकालाचे कामही करत आहेत. अशावेळी शिक्षकांना उपनगरीय रेल्वे प्रवास करण्याची परवानगी नाही. त्यामुळे शालेय कामे खोळंबलेली आहेत. त्यातच आता दहावीच्या शिक्षकांना बीएलओचे (बूथ लेव्हल ऑफिसर) काम दिले आहे. त्याचा परिणाम दहावीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे. यामुळे दहावीचा निकाल तयार करणाऱ्या शिक्षकांना बीएलओचे दिलेले काम तत्काळ रद्द करण्याची मागणी, शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.सविस्तर वाचा...
  7. नवी दिल्ली : दरवर्षी २१ जून हा दिवस विश्व योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सलग दुसऱ्या वर्षी हा योग दिवस कोरोना महामारीमध्ये येतो आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी सकाळी साडेसहा वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. सविस्तर वाचा...
  8. जळगाव -'शिवसेनाप्रमुख हे शिवसेनेचे गँग प्रमुखच आहेत. त्या गँग प्रमुखाच्या बापाने काय केले, हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगाला माहिती आहे. गँग प्रमुखाच्या नादाला लागू नका. कारण गँग प्रमुखाने नुसता आदेश दिला, तरी बाकी काय होते', हे मुंबईच्या सेना भवनासमोर सर्वांनी पाहिले, अशा शब्दांत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे.सविस्तर वाचा..
  9. मुंबई -कोरोनामुळे भारतीय रेल्वेकडून नियमित रेल्वे गाड्यांना नवीन क्रमांक देऊन विशेष भाड्यावर चालविण्यात येत आहे. त्यातच आता मध्य रेल्वे, दक्षिण रेल्वे, पश्चिम-मध्य रेल्वे आणि उत्तर-पश्चिम रेल्वे या चार झोनच्या कोकण मार्गाने धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या सुपरफास्ट नसतानासुद्धा प्रवाशांकडून सुपरफास्टचा शुल्क आकारत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेच्या चुकीचा धोरणामुळे दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळे रेल्वेने याकडे लक्ष घालून तत्काळ प्रवाशांकडून सुपरफास्ट शुल्क घेणे थांबविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. सविस्तर वाचा...
  10. मुंबई - कोरोनाचा विषाणू म्युटेंट होत आहे, म्हणजेच ती बदलत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ''डेल्टा प्लस" समोर आला आहे. जे अधिक भयानक आहे. त्यातच, प्रसार माध्यमांमध्ये राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरियंटचे 7 रुग्ण सापडले असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. त्यातले 5 रुग्ण रत्नागिरीचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, डेल्टा प्लस या व्हेरियंटचा एकही रुग्ण राज्यात सापडला नसल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाणे यांनी सांगितले आहे. सविस्तर वाचा...
Last Updated : Jun 20, 2021, 11:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details