महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @  1 PM
Top 10 @ 1 PM

By

Published : May 24, 2021, 7:10 AM IST

Updated : May 24, 2021, 1:05 PM IST

  1. मुंबई -महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आज राज्यात 26 हजार 672 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरामध्ये 29 हजार 177 रुग्णांनी कोरोवर मात केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 594 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा..
  2. पुणे -सीरमचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी लसीकरणासंदर्भात केलेल्या विधानावर स्पष्टीकरण देताना त्यांना कंपनीच्या वतीने अधिकृतपणे बोलण्याची परवानगी नसल्याचे सीरमचे सीईओ अदर पुनावालांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा..
  3. सिंधुदुर्ग- विरोधी पक्षनेत्यांनी बेंबीच्या देठापासून राज्य सरकारवर टीका करण्यापेक्षा पंतप्रधानांना भेटून केंद्राकडून आपत्ती व्यवस्थापनाचे पैसे केंद्राकडून आणले तर त्यांना शाबासी देऊ, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधकांना लगावला. सविस्तर वाचा..
  4. रत्नागिरी -तौक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्यालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी (21 मे) कोकण दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सविस्तर वाचा..
  5. पणजी (गोवा)- कोरोनाच्या आजारामुळे गोवा सरकारने दहावीची बोर्ड परीक्षा रद्द करण्याची घोषणा रविवारी (दि. 23 मे) केली. येत्या दोन दिवसांत बारावीच्या निर्णयाची घोषणा केली जाईल, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी (दि. 23 मे) केली आहे. सविस्तर वाचा..
  6. रत्नागिरी -नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे आता लोकांचेही मत झालेले आहे. यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. सविस्तर वाचा..
  7. मुंबई -पुढील तीन ते चार दिवसांत मध्य महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे. सविस्तर वाचा..
  8. मुंबई -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी मुंबईचे लसीकरण ६० दिवसात पूर्ण करू, परंतु कोरोना लसींचे डोस उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा..
  9. नवी दिल्ली -अॅलोपॅथी उपचार पद्धतीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर रामदेव बाबा अडचणीत आले आहेत. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी प्रतिक्रिया दिली. रामदेव बाबा यांचे विधान निराशाजनक होते. त्यांनी आपले विधान मागे घ्यावे, असे हर्षवर्धन म्हणाले. सविस्तर वाचा..
  10. नवी दिल्ली -कोरोना संकटामुळे शैक्षणिक वेळापत्रक पूरते कोलमडले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी राज्य शिक्षण मंत्री आणि सचिवांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत बारावी परीक्षासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. राज्य सरकारांना 25 मे पर्यंत या संदर्भात सविस्तर सूचना पाठविण्याच्या सांगितले आहे. सविस्तर वाचा..
Last Updated : May 24, 2021, 1:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details