महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top-ten-news-stories-around-the-globe
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...

By

Published : Mar 2, 2021, 9:49 PM IST

Updated : Mar 2, 2021, 10:51 PM IST

  • पुणे -येथील भोसरी भुखंड घोटाळा प्रकरणात तत्कालीन महसूल मंत्री आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात तत्कालीन मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या निवृत्त न्यायाधीश झोटींग कमिटीचा अहवाल संदर्भ म्हणून वापरला जावा, अशी मागणी तक्रारदारातर्फे करण्यात आली आहे.

खडसे जमीन घोटाळा प्रकरण : झोटिंग कमिटीचा अहवाल संदर्भ म्हणून वापरण्याची मागणी

  • ठाणे - कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून देशभर नागरिकांना कोरोनापासून बचाव करणाऱ्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन प्रतीक्षा कक्षात थांबलेल्या व्यक्तीला लसीकरण केंद्रातच चक्कर आली. त्यानंतर त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना भिवंडीतील भाग्यनगर येथील लसीकरण केंद्रात मंगळवारी (दि. 2 मार्च) घडली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

भिवंडीत कोविडची दुसरी लस घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू ?

  • मुंबई -राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा आज पुन्हा वाढ झाली आहे. काल (सोमवारी) रुग्णांची संख्या 6 हजारांच्या घरात होती तर आज (मंगळवारी) त्यात वाढ होऊन ती 7 हजारावर गेली. राज्यात आज 7 हजार 863 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात नव्या 7 हजार 863 नव्या रुग्णांची नोंद, तर 54 रुग्णांचा मृत्यू

  • बिझनेस डेस्क, ईटीव्ही भारत- देशामध्ये दूरसंचारमधील स्पेक्ट्रमचा आज पहिला लिलाव झाला आहे. हे स्पेक्ट्रम पाच वर्षासाठी ७७,८१४.८० कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत. यामधील सर्वात मोठा हिस्सा अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स जिओने घेतला आहे.

स्पेक्ट्रम खरेदीत जिओची बाजी; केंद्र सरकारला मिळाले तब्बल ७७,८१५ कोटी रुपये!

  • मुंबई - संजय राठोड आमचे मित्र आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना आम्हाला त्रास होतो. पण पूजा चव्हाण प्रकरण घडल्यानंतर 20 दिवस कुठलीच कारवाई का होत नाही? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. इतके थेट पुरावे असताना पोलीस काम करत नसतील तर वानवाडी पोलीस स्टेशनच्या पीआयला तत्काळ निलंबित करायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.

पूजा चव्हाण प्रकरणात कारवाई का नाही? विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक

  • नवी दिल्ली : गुजरातमध्ये आज स्थानिक निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. रात्री आठ वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपाने येथे मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. भाजपावर दाखवलेल्या या विश्वासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत.

स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपाची बाजी; पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या जनतेचे मानले आभार

  • मुंबई -राज्यात कोरोनग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय झालेला आहे. या संदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत अनेक जिल्ह्यांत संचारबंदी लागू केली आहे. राज्यात मंगळवारी 7 हजार 863 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 54 बाधितांचा मृत्यू झाला. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील विविध ठिकाणची परिस्थिती काय आहे? यासंदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा.

Corona Bulletin : राज्यातील कोरोना संदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा

  • कोल्हापूर- मनाविरुद्ध घटस्फोट मागणाऱ्या सासू, सासरा, नवरा आणि आई-वडिलांच्या विरोधात मुलीने अक्षरशः टाहो फोडला. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा मागे घेण्यासाठी तीन लाख रुपये घे, पण घटस्फोट दे! म्हणणाऱ्या नातेवाईकांचा डाव मुलीने उधळून लावला आहे. ही घटना कोल्हापुरातील कसबा-बावडा रस्तावर घडली. दरम्यान, या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोल्हापूर : मनाविरुद्ध घटस्फोट घडवणाऱ्या सासू, सासऱ्या आणि आईविरोधात मुलीचा टाहो

  • मुंबई - भारत आणि चीनचे संबंध 2020 मध्ये टोकाचे ताणले गेले होते. चीनकडून सीमेवर होणाऱ्या कारवाया भारताने परतवलेल्या जरी असल्या तरी भारतावर चीनचे सायबर दहशतवादी डोळा ठेवून आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात चीनच्या सायबर हल्ल्यामुळे अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याची शक्यता सायबर सेलने व्यक्त केली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली.

Mumbai Blackout : भारतावर सायबर हल्ल्याचे ढग; काय आहे सरकार, विरोधक अन् विशेषज्ञांचे मत ?

  • मुंबई- अभिनेता कार्तिक आर्यन याने मंगळवारी राम माधवानी दिग्दर्शित थ्रिलर 'धमाका' या सिनेमातील आपल्या व्यक्तिरेखेची ओळख करून दिली. आर्यन याने जाहीर केले की त्याचा आगामी धमाका हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रिमिंग होणार आहे.

'धमाका'मधील अर्जुन पाठकची कार्तिक आर्यनने करुन दिली ओळख

Last Updated : Mar 2, 2021, 10:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details