- जयपूर -दिल्लीमध्ये 43 दिवसांपासून शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातूनही अनेकजण जात आहेत. मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील लहान मुले आणि महिला या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला निघाले आहेत.
सविस्तर वाचा -मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची दिल्लीकडे कूच, म्हणाले...
- मुंबई- राज्यात सध्या औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून राजकारण तापू लागले आहे. त्यातच सत्तेत असलेल्या महाविका आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला ठणकावून विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराच्या विषयावरून थेट माहिती व महासंचानलायाच धारेवर धरले आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर राज्यातील अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मराठा समाजाच्या संघटनांकडून थोरात यांच्या विरोधात आंदोलनेही केली आहेत. मात्र, तरीही काँग्रेस शहरांच्या नामांतराविरोधात ठाम आहे.
सविस्तर वाचा -सरकारी कामकाजात संभाजीनगर हा उल्लेख काँग्रेसला अमान्य; थोरातांनी पुन्हा ठणकावले
- मुंबई -चेंबूरमधील जनता मार्केट परिसरात रात्री आग लागली. रात्री साडेतीनच्या सुमारास लागलेल्या आगीत 8 ते 10 दुकाने जळून खाक झाली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 8 पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.
सविस्तर वाचा -चेंबूर रेल्वे स्टेशनजवळील जनता मार्केटमध्ये आग
- नागपूर - जिल्ह्यातील कामठी येथे एका बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले. दाल ओळी नंबर २ येथील ही घटना असून दुर्गंधी आल्याने हा प्रकार लक्षात आला. कल्पना लवटे( वय 50) आणि पद्मा लवटे (वय 60) अशी मृत महिलांची नावे आहेत.
सविस्तर वाचा -बंद घरात आढळले दोन सख्ख्या बहिणींचे कुजलेले मृतदेह
- मुंबई - भाजपा आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आलेली आहे. पंधरा दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 2009 मधील मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक गैरव्यवहारा संबंधात ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात 2014 मध्ये प्रसाद लाड यांच्यावर गुन्हाही दाखल झाला असल्याचे समोर येत आहे.
सविस्तर वाचा -आर्थिक गुन्हे शाखेची भाजपा आमदार प्रसाद लाड यांना नोटीस
- मुंबई - राहुल गांधी हे कमकुवत नेते आहेत’ असा प्रचार करूनही गांधी अजूनही उभे आहेत आणि मिळेल त्या मार्गाने वारंवार सरकारवर हल्ले करत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे ठेऊन विरोधी पक्षाला कमकुवत केले जाईल. मात्र विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखतून उभा राहिल आणि तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतो. राहुल गांधीचे भय दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटते लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते आणि राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे, अशा शब्दात शिवसेनेने मुखपत्र सामना मधून राहूल गांधीचे कौतुक करत केंद्रातील भाजप सरकारवर विरोधकांच्या गळे दाबण्याच्या प्रयत्नावरून कोरडे ओडले आहेत.