अंबाला - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटना दिल्लीकडे कूच करत आहेत. येत्या 26 ते 27 नोव्हेंबरला पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटना केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’चे आवाहन केले आहे.
सविस्तर वाचा -कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांची दिल्लीकडे कूच; पोलिसांकडून आंदोलकांवर पाण्याचा मारा
पुणे- राज्यात सध्या लॉकडाऊनकाळातील वाढीव वीजबिलांचे राजकारण तापू लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारने आपल्याला विजेचा शॉक दिला. आता आपण या सरकारला मतदानाचा शॉक देऊ, अशी टीका फडणवीस यांनी पुण्यात केली आहे.
सविस्तर वाचा -'सरकारने विजेचा शॉक दिला, आता आपण मतदानाचा शॉक देऊ'
नागपूर - राज्यात एक डिसेंबरला होऊ घातलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यवतमाळ, वर्धा जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर नागपुरात पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी हे सरकार कोसळणार असल्याचे भाकीत वर्तवल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ज्याप्रकारे यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, तो केवळ आम्ही एक आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे दरेकर म्हणाले. या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सर्वात मोठा लाभार्थी आहे. त्यामुळे, त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित होती. मात्र, तिन्ही पक्षात ताळमेळ नसल्याने पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर हे सरकार कोसळणार असल्याचे भाकित दरेकर यांनी व्यक्त केले आहे.
सविस्तर वाचा -'राष्ट्रवादी हा सरकारमधील सर्वात मोठा लाभार्थी पक्ष; पदवीधर निवडणुकीनंतर राज्याचे राजकारण बदलेल'
मुंबई - कोणाच्याही ध्यानीमनी नसताना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे तीन पक्षाचे सरकार मागील वर्षी राज्यात सत्तारूढ झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून, ही मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
सविस्तर वाचा -ठाकरे सरकारची वर्षपूर्ती.. उद्धव ठाकरेंची मुलाखत लवकरच होणार प्रदर्शित, संजय राऊत यांनी वाढवला सस्पेन्स
मुंबई- कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी काही निर्बंध लादण्यात आले असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग, तसेच तपासणी करण्यात येत असून, ज्या प्रवाशांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आहे, अशा प्रवाशांनाच राज्यात प्रवेश दिला जात आहे. ज्या प्रवाशांकडे कोरोना तपासणी अहवाल नाही, अशांची स्क्रीनिंग व तपासणी करूनच त्यांना राज्यात प्रवेश दिला जात आहे. तपासणी दरम्यान एखादा संशयित आढळून आल्यास त्यास क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सविस्तर वाचा -कोरोना अपडेट : परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवरील निर्बंध आजपासून लागू