जयपूर (राजस्थान) - दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस हवालदारांना जयपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. बोरिवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, हवालदार लक्ष्मण, हवालदार सचिन अशोक गुंडके आणि हवालदार सुभाष पांडुरंग नरके यांना एसीबीने जयपूरमध्ये अटक केली आहे.
सविस्तर वाचा -दोन लाखांची लाच घेताना मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यासह तीन हवालदारांना अटक; जयपूर एसीबीची कारवाई
मुंबई -आज राज्यात ५ हजार ४३९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ लाख ८९ हजार ८०० वर पोहोचला आहे. राज्यात आज ३० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६ हजार ६८३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८३,२२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
सविस्तर वाचा -राज्यात ५ हजार ४३९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ; ३० मृत्यू
मुंबई - दिल्ली, राजस्थान आदी अन्य राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र, आपल्याकडे अजून तरी तशी स्थिती नाही. यामुळे तुर्तास लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात टोपे यांनी ही माहिती दिली.
सविस्तर वाचा -'लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही'
मुंबई - टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून खुलासा करण्यात आल्यानंतर यासंदर्भात आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून याची चौकशी सुरू असताना यासंदर्भात मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जवळपास 140 साक्षीदार व 1 हजार 400 पानांचे आरोपपत्र आहे.
सविस्तर वाचा -टीआरपी घोटाळा : मुंबई पोलिसांनी दाखल केले 1400 पानांचे आरोपपत्र; 140 साक्षीदारांचा समावेश
मुंबई - कोरोनाची दुसरी लाट येणार याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरी लाट आल्यास मुंबई महापालिका सज्ज आहे. मुंबईत कोरोना सेंटर, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह तब्बल ७० हजार बेड्स सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
सविस्तर वाचा -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बीएमसी सज्ज