मुंबई -बनावट लसीकरण प्रकरणीकांदिवलीच्या शिवम रुग्णालयाचे मालक असलेल्या जोडप्याला पोलीसांनी अटक केल्याची माहिती, मुंबईचे सह पोलीस आयुक्तांनी दिली. सविस्तर वाचा..
अमरावती- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे मागील अनेक महिन्यापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या चिखलदऱ्यातील वैराट जंगल सफारी ही बंद करण्यात आली होती. परंतू ही जंगल सफारी बंद असल्याने येथील जिप्सी चालक, वाहक गाईड यांना अर्थिक फटका बसत होता. तर पर्यटकांचा देखील हिरमोड होत होता. त्याच पार्श्वभूमीवर आता कोरोना नियमांचे पालन करून आजपासून ही जंगल सफारी सुरू करण्याची परवानगी वनविभागाकडून देण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
ठाणे -अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर यास ठाणे तुरुंगातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आलेली आहे. त्याला आज (शुक्रवार) भिवंडी येथील कोर्टात दाखल करण्यात येणार आहे. ठाणे जेल मधून एनसीबीचे अधिकारी हे त्याला घेवून निघाले आहेत. १ पोलीस व्हॅन, १ एम्बयुलन्स आणि दोन पोलीस जीप अशा ताफ्यातून त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती एनसीबीअधिकाऱ्यांची दिली आहे. सविस्तर वाचा..
बारामती - बेकायदेशार सावकारकीच्या पैशासाठी एकाचा खून करून त्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या खासगी सावकाराने एका साथीदाराच्या मदतीने निमगाव केतकी येथील २७ वर्षीय युवकाचे पैशासाठी अपहरण केले. तसेच पैशाच्या मोबदल्यात जमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून अंगावर पेट्रोल टाकत त्या युवकाला जिवंत जाळल्याची घटना इंदापूर तालुक्यातील जंक्शन फाॅरेस्ट हद्दीत घडली आहे. या घटनेत युवक ९५ टक्के भाजल्याने तीन दिवसांच्या उपचारानंतर युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ आरोपींना बेड्या ठोकत जेरबंद केल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली. सविस्तर वाचा..
नवी दिल्ली -मुंबई 26/11 हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर राणा सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. लॉस एंजेलिसमधील फेडरल न्यायाधीशांनी प्रत्यार्पणाच्या प्रकरणात वकिलांना 15 जुलैपर्यंत अतिरिक्त कागदपत्रे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तहव्वुर राणा यांना भारताकडे कधी सोपवण्यात येणार हे अद्याप स्पष्ट नाही. तोपर्यंत राणा अमेरिकेच्या कोठडीत राहणार आहे. भारत सरकारच्या विनंतीनुसार, तहव्वुर राणा यांची प्रत्यर्पण सुनावणी लॉस एंजेलिस येथील दंडाधिकारी न्यायाधीश जॅकलिन चुलजियान यांच्या न्यायालयात पार पडली. सविस्तर वाचा..
शिर्डी (अहमदनगर) -साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळ नेमतांना शिर्डीतील निष्ठावंत शिवसैनिकांना डावलले गेल्याने शिवसैनिकांमधुन नाराजीच सुर उमटतोय. महाविकास आघाडी सरकारने विश्वस्त मंडळ यादी जाहीर केली आहे. त्यात शिवसेनेने केवळ चारच संभाव्य विश्वस्तांची नावे समोर आली आहेत. शिर्डीकरांचा विश्वस्त नेमणुकीत विचार करावा. यासाठी आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन स्थानिक शिवसैनिकाना साई संस्थानच्या विश्वस्त पदाची संधी देण्याची मागणी केली जाणार आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्येही नाराजी असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. सविस्तर वाचा..
भटिंडा-एकविसाव्या शतकात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करत आहेत. सर्वच क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करत आहेत. ही गोष्ट भटिंडाला राहणाऱ्या छिंदर पाल कौर यांनी खरे करून दाखवले आहे. साधारणपणे महिला रिक्शा चालवत नाहीत. मात्र, ती दोन वेळची भाकरी मिळवण्यासाठी त्या रिक्शा चालवत आहे. स्त्रियांविरुध्द वाढत जाणारे अत्याचार पाहून त्या पुरूषांचे कपडे घालणे पसंत करतात. गरिबी असूनही भटिंडाला राहणारी छिंदर कौर पाल ही धैर्याने सामना करत जीवन जगत आहे. सविस्तर वाचा..
नवी दिल्ली -एपीजे अब्दुल कलाम मार्गावरील इस्रायलच्या दूतावासाबाहेर 29 जानेवरीला स्फोट झाला होता. याप्रकरणी चार विद्यार्थ्यांना कारगिलमधून अटक करण्यात आली असून त्यांना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला आणण्यात आले आहे. अनेक तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. संबंधित तरुण दिल्लीमध्ये शिक्षण घेत होते. सविस्तर वाचा..
मुंबई- केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि सीबीआयकडून राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि सीबीआय़ या केंद्रीय यंत्रणा भाजपाच्या कार्यकर्त्या आहेत का? असा खोचक टोला लगावला आहे. तसेच जर या संस्थांना तपासच करायचा असेल तर त्यांनी राम जन्मभूमी मंदिर टस्टच्या जमीन घोटाळ्यासंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली. सविस्तर वाचा..
मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर 25 फेब्रुवारी रोजी स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिन स्फोटके सापडली होती. यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचा बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यास अटक केली होती. या दरम्यान सचिन वाझे याची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान आात राज्याच्या लाचलुचपत विभागाकडून सचिन वाझे याची खुली चौकशी केली जाणार आहे. सविस्तर वाचा..