मुंबई -नवी मुंबई मधील विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे म्हणून मोर्चा काढण्यात आला आहे. आज (गुरुवार) निघालेल्या मोर्चामध्ये मनसे नेते आणि पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील सहभागी झाले आहेत. तर या अगोदर मनसे नेते राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले जावे असे म्हटले होते. याबद्दल आमदार पाटील यांना विचारले असता, मोर्चाची ताकद वाढवण्यासाठी आपण या मोर्चात सहभागी झाल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा..
ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील वाशिंद-खातीवली गावानजीक ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन भीषण आपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील ३ जण जागीच ठार झाले तर एक 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या मुलीला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णायात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाशिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चालकाला ताब्यात घेतले आहे. लल्लन राय असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. तर मंजुळा सखाराम मुकणे, अजनूप शिरोळ, गणपत दगडू वाघे आणि बाबू मधू फसाळे असे अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे आहेत. सविस्तर वाचा..
सिंधुदुर्ग -कोरोनाच्या महामारीमध्ये राज्यसरकार, जिल्हाप्रशासन तसेच सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री आणि आमदार यांच्याकडून सातत्याने बेजबाबदार कृत्य होत आहेत. एका बाजूला आरोग्यमंत्री रत्नागिरीत कोरोनाचा डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याचे सांगत असताना रत्नागिरीचे स्थानिक आमदार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे सांगतात, की रत्नागिरीला पेशंटच नाहीत. परंतु, त्याचवेळी सिंधुदुर्गातही डेल्टा प्लसचा रुग्ण आढळून येतो. मग पालकमंत्री ही बाब लपवून का ठेवत आहेत ? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. सविस्तर वाचा..
बीड- सोने विक्री करताना सोनारांना आता हॉलमार्क असलेलेच सोने विक्री करता येणार आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेचा देखील लोगो सोने खरेदी केलेल्या वस्तूवर राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना उत्तम दर्जाचे सोने मिळेल व ज्या ठिकाणाहून सोने घेतले त्या दुकानदाराच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जरी ते सोने मोडले तरी हॉलमार्क असल्यामुळे सोन्याच्या वस्तु चे चांगले पैसे ग्राहकांना मिळू शकतील, अशी माहिती बीड येथील सचिन ज्वेलर्सच्या प्रमुख कल्पना डहाळे यांनी दिली. सविस्तर वाचा..
गोंदिया:- राज्य परिचारिका संघटनेने बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, कोविड प्रार्दुभावात काम केल्याचा जोखीम भत्ता मिळावा, केंद्राप्रमाणे वेतन द्यावे, नवी पदभरती करावी, तसेच कोविड प्रार्दुभावात काम करतांना दगावलेल्या परिचारिकांना शासनाकडून ५० लाखांची मदत मिळावी, या मागण्यांसाठी गोंदियाच्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. १०० पेक्षा जास्त परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य अधिपरिचारिका संघटनेकडून २१ व २२ जून रोजी २-२ तासांचे सांकेतिक आंदोलन करण्यात आले. तसेच बुधवारपासून संपूर्ण वेळ बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. सविस्तर वाचा..