- कोल्हापूर -दारू पिण्यासाठी स्वतःच्या आईला ठार मारून तिचे काळीज काढणाऱ्या नराधमाला गुरूवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सुनील कोचकोरवी असे आरोपीचे नाव आहे. पैसे न दिल्याच्या रागातून मद्यपी मुलाने आईचा निर्घृण खून केला होता. आईच्या मृतदेहाचे तुकडे करून तिचे काळीजही बाजुला काढले होते. हेही वाचा..
- मुंबई - नवीन केंद्रीय मंत्र्यांना आपला देश सांभाळायचा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. कोरोनाविरोधात लढा सुरू असताना देशात महागाई देखील वाढतीए. त्यामुळे ही सर्व परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवर आली आहे, असेही ते म्हणाले. सविस्तर वाचा..
- सांगली (इस्लामपूर) - मृत रुग्ण जीवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार इस्लामपुर ता. वाळवा येथे उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणूक व मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी इस्लामपूर येथील आधार हेल्थ केअरचा डॉ. योगेश रंगराव वाठारकर याला अटक करण्यात आली आहे. डॉ. वाठारकर याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करून अटक केल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कासेगाव येथील आचारी काम करणाऱ्या सलीम हमीद शेख यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती.सविस्तर वाचा..
- मुंबई-भाजपामधून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयने (ईडी) समन्स बजावला. ईडी कार्यालयात हजर राहण्याआधी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र रात्री उशीरा त्यांची प्रकृती खालावली असल्याचे माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून देण्यात आली. तसेच दहा वाजता घेणारी पत्रकार परिषदही रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सविस्तर वाचा..
- मुंबई - राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची दुपारी १२ वाजता शिवसेना भवन येथे बैठक बोलावण्यात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते मार्गदर्शन करतील. शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यावेळी उपस्थित राहणार आहेत. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांची वर्णी लागल्यानंतर या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. सविस्तर वाचा..
- नंदुरबार - तळोदा तालुक्यातील तळवे मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये तब्बल 5 जणांचा मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातामध्ये तुळाजा येथील 3 आणि तळोदा येथील 2 मृतांचा समावेश असून त्यामध्ये एका गाडीवरील माय-लेकाचा तर दुसऱ्या गाडीवरील बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. सविस्तर वाचा..
- पुलवामा (जम्मू) -बुधवारी मध्यरात्रीपुंचल भागात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. यात जवानांनी ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या कारवाईबाबत जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पोलीस आणि जवानांचे कौतुक केले. ही माहिती एनआयकडून मिळाली. सविस्तर वाचा..
- सोलापूर- महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी घनकचरा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुगल कॅलेंडर कामकाज प्रणाली आणली आहे. या कामकाज प्रणालीत घनकचरा कर्मचाऱ्यांचे प्रत्येक तासाला काम करतानाचे फोटो आवश्यक केले आहे. आयुक्तांच्या या आदेशाला तीव्र विरोध करत कर्मचाऱ्यांनी बुधवारी पालिकेच्या मुख्य सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली :मोदी 2.0 सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातून अपेक्षेप्रमाणे नारायण राणे, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार यांना संधी मिळाली आहे. चौघांसह एकूण 43 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 43 मंत्र्यांचा समावेश झाला असून काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले मध्य प्रदेशातील दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनाही यात स्थान मिळाले आहे. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार करण्यात आला आहे. या विस्तारानंतर मंत्रिमंडळाचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. नवीन सुरू करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे राहणार आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: देखरेख करणार आहेत. सविस्तर वाचा..
Top 10@ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या; वाचा एका क्लिकवर - दहा महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना, पाऊस यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10@ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या; वाचा एका क्लिकवर
Last Updated : Jul 8, 2021, 1:02 PM IST