मुंबई :आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या बुलेटीनच्या माध्यमातून. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यांना जेल की बेल याचा निर्णय आज होणार आहे. या आधी महाविकास आघाडीच्या अनिल देशमुखांना ( Anil Deshmukh ) ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे, तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनाही जामीन मिळाला आहे. आता नवाब मलिक यांचे काय होणार याचा निर्णय आज होणार आहे.
रविकांत तुपकर यांचे आज जलसमाधी आंदोलन :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनात सामील होण्यासाठी निघाले आहेत. रविकांत तुपकर त्यांच्या 600 कार्यकर्त्यांसह 60 ते 70 गाड्यांचा ताफा बुलढाण्यातून निघाला आहे. या आंदोलनात मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते ठिकठिकाणाहून सामील होणार असल्याचा दावा करण्यात येतोय. बुलढाण्याहून हा ताफा बुलढाणा-सिल्लोड-औरंगाबाद-नगर-पूणे मार्गे जाऊन मुंबईत येणार आहे. रविकांत तुपकर यांनी आज सकाळी मंत्रालयाजवळ असलेल्या अरबी समुद्रात कार्यकर्ते जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 157 कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु जाहीर झालेली मदत ही तुटपूंजी असून आपण जलसमाधीवर ठाम असल्याचे तुपकरांनी म्हंटले आहे.