मुंबई :आजच्या दिवसभरातीलमहत्त्वाच्या घडामोडींचाथोडक्यात आढावा (Top News Today) वाचा. भारतीय नौदलाची नौदल कमांडर्स परिषद, पंतप्रधानांचा गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस, गोदावरी सिनेमाच्या ट्रेलर लॉंचिंगला उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित, किशोरी पेडणेकर आज चौकशीसाठी हजर राहणार, इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी, गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजपा नेत्यांची टीम गुजरातला, केजरीवाल यांचा हरियाणामध्ये रोड शो, अमित शहा आज दिल्लीत चार कार्यक्रमांना उपस्थित राहणार, हिमाचल प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांची जाहीर सभा या घटना दिवसभरात महत्त्वाच्या असणार आहेत.
आजपासून भारतीय नौदलाची नौदल कमांडर्स परिषद (Council of Naval Commanders of Indian Navy) : आजपासून भारतीय नौदलाची नौदल कमांडर्स परिषद सुरू होत आहे. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाची चार दिवसीय नौदल कमांडर्स परिषद आहे.
पंतप्रधानांचा गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस (PM Modi Gujarat visit) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. ते केवडिया येथे आयोजित राष्ट्रीय एकात्मता दिन सोहळ्यात सहभागी होणार.
गोदावरी सिनेमाच्या ट्रेलर लॉंचिंगला उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित (Devendra Fadnavis will attend Godavari movie trailer launch) : मुंबई- गोदावरी सिनेमाच्या ट्रेलर लॉंचिंगला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर, सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरु होणार आहे.
किशोरी पेडणेकर आज चौकशीसाठी हजर राहणार (Kishori Pednekar SRA scam) : एसआरएच्या कथित घोटाळ्या प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर दादर पोलिस स्थानकात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.