ऑस्ट्रेलियन ओपन : नदालने मेदवेदेवचा पराभव करून पटकावले २१ वे ग्रँडस्लॅम जेतेपद
मुंबई - 35 वर्षीय नदालने 21 व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी धडाकेबाजपणे खेळत रशियन खेळाडूला 2-6, 6-7, 6-4, 6-4, 7-5 अशा पाच सेटमध्ये पराभूत करून चॅम्पियनशिप जिंकली.
आज आर्थिक पाहणी अहवाल, उद्या अर्थसंकल्प
नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. पेगॅसिस प्रकरण गाजण्याची शक्यता आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अहमदनगर दौऱ्यावर; शिर्डीत साईसमाधीचे घेतले दर्शन
अहमदनगर -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आजपासुन दोन दिवस अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असल्याने शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्या पूर्वी एका कार्यक्रमा दरम्यान राज्यपाल शिर्डी दौऱ्यावर आले होते.
नवी दिल्ली -संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत.
अखिलेश यादव आज करहाल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
नवी दिल्ली - देशभरात चर्चेत असलेली निवडणूक उत्तर प्रदेशातील विधानसभा आहे. त्यामध्ये सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव पहिल्यांदा निवडणुक लढवत असल्याने जास्त चर्चा आहे.
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज बैठक होणार असून, मतदानाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या राज्यांमधील निर्बंधांचा आढावा घेण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाची आज बैठक होणार आहे. यामध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या राज्यांमधील निर्बंधांचा संपुर्ण आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पंजाब विधानसभा निवडणूक: चन्नी आज भदौरमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
नवी दिल्ली - पंजाब विधानसभा निवडणूकीचे चांगलेच वारे वाहत आहे. येथे मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते चन्नी आज भदौर येथून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
पंजाब विधानसभा निवडणूक: कॅप्टन अमरिंदर सिंग आज पटियाला येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
नवी दिल्ली - पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज आपला पटियाला येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
UP निवडणूक: PM मोदींची आज पहिली आभासी रॅली, 21 विधानसभा मतदारसंघातील लोकांना संबोधित करणार
नवी दिल्ली - UP निवडणूक: PM मोदींची आज पहिली आभासी रॅली, 21 विधानसभा मतदारसंघातील लोकांना संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपली पहिली व्हर्चु्वर रॅली करत आहेत. त्यामध्ये ते 21 विधानसभा मतदारसंघातील लोकांना संबोधित करणार आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत आजपासून दोन दिवसीय कोलकाता दौऱ्यावर आहेत
नवी दिल्ली -सरसंघचालक मोहन भागवत आजपासून दोन दिवसीय कोलकाता दौऱ्यावर आहेत. यामध्ये ते विविध ठिकाणी भेटी देणार असून काही कार्यक्रमांमध्येही सहभागी होणार आहेत.