महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Top News in Marathi : अनिल देशमुख यांचा मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज - आजच्या महत्वाच्या बातम्या

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Today Top News in Marathi : अनिल देशमुख यांचा मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज
Today Top News in Marathi : अनिल देशमुख यांचा मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज

By

Published : Jan 28, 2022, 5:04 AM IST

अनिल देशमुख यांचा मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज

मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने काही दिवसांपुर्वीच देशमुख यांचा डिफॉल्ट जामीन नाकारला होता. त्यानंतर त्यांनी आता मुंबई सत्र न्यायालयातील कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन

मुंबई - महाराष्ट्र सरकारने आता खुल्या बाजारात दारू विकण्यास परवाणगी दिली आहे. या निर्णयावरून राज्य सरकारवर उलटसुलट टीका होत आहे. दरम्यान, भाजप जास्त आक्रमक होण्याच शक्यता आहे.

राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, पाहा कुठे कुणाची लॉटरी..

मुंबई- राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी गुरूवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये १३९ नगरपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. आज नगराध्यक्ष निर्णय होण्याची शक्यता.

रेल्वे परीक्षेवरून विद्यार्थ्यांच्या उद्रेकानंतर रेल्वेला सुचले शहाणपण; घेतला 'हा' निर्णय

मुंबई -देशातील सर्व रेल्वे भरती बोर्डानी उमेदवारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहेत. उमेदवारांचा काही समस्या किंवा तक्रारी असल्यास थेट रेल्वे भरती मंडळाच्या अध्यक्षांना भेटता येणार आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांना सुप्रिम कोर्टाने जामीन नाकारला आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांना सुप्रिम कोर्टाने जामीन नाकरला आहे. त्यासोबतच पुढील दहा दिवसांत पोलिसांपुढे हजर होण्याच आदेश दिले आहेत. दरम्यान, याबाबत आज काही निर्णय होण्याची शक्यता आहेत.

लेखक, सामाजिक कार्यकर्ते अनिल आवचट यांचे निधन

पुणे -प्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचे दीर्घ आजाराने पुणे पत्रकारनगर येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ.अनिल अवचट यांना श्रद्धांजली अर्पण केली.

-कालच्या काही घडामोडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई - प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ध्वजारोहणाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी तथा सामना दैनिकाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केला असल्याची तक्रार पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी केली आहे

मुंबईत चार मजली इमारत कोसळली.. ९ जणांना ढिगाऱ्याखालून काढले

मुंबई -शहरातल्या बांद्रा भागातील ए के मार्ग, बेहराम नगर, रजा मस्जिद जवळ एक चार मजली बांधकाम असलेले घर कोसळले आहे. दुपारी ४ च्या दरम्यान हे बांधकाम कोसळले असून, ढिगाऱ्याखाली काही जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी ९ जणांना बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आज वेरूळ अजिंठा लेणीची पाहणी करणार

औरंगाबाद - राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. (Tourist Spots Will Reopen) गुरुवारी ते वेरूळ अजिंठा लेणी परिसराची पाहणी करणार आहेत. लेणी परिसरात असणाऱ्या अडचणी बाबत अनेक वेळा तक्रारी आहेत. त्यामुळे त्या प्रत्यक्ष जाऊन पाहणार असून पाण्याची आणि विजेच्या समस्येबाबत जाणून घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

कोल्हापूरचे पालकमंत्रीसतेज पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः त्यांनी याबाबत फेसबुक पोस्ट द्वारे माहिती दिली आहे. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, आज दिवसभरात त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी भेट दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details