आर्यन खान तपास प्रकरणातून समीर वानखेडेंना हटवले... नवाब मलिक म्हणाले, ही तर फक्त सुरुवात
अखेर आर्यन खान प्रकरणातून एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखडे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. खंडणीच्या आरोपानंतर तपास काढून घेण्यात आल्याची माहिती आहे.
आर्यन खान प्रकरणातून मला हटवले नाही - एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची प्रतिक्रिया
मला आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून हटवले गेलेले नाही. या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी व्हावी, अशी माझी न्यायालयात रिट याचिका होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाची दिल्ली एनसीबीची एसआयटी चौकशी करत आहे. हे दिल्ली आणि मुंबई एनसीबीच्या पथकाचे समन्वय आहे, अशी प्रतिक्रिया एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.
T20 World Cup 2021 : भारताचा 8 गडी व 81 चेंडू राखून स्कॉटलंडवर दणदणीत विजय
भारत विरुध्द स्कॉटलंड यांच्यात टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच लढतीत शानदार विजय मिळवला आहे. भारतीय सलामी जोडी के एल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या दमदार खेळाच्या जोरावर भारताने 8 गडी व 81 चेंडू राखून स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवलाय यामुळे भारत गुणतालिकेमध्ये ग्रुप 2 मध्ये तिसऱ्या स्थानवर पोहोचला आहे. आजच्या विजयामुळे भारताचे रेटींगही वाढले आहे.
भारत १० नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानवर प्रादेशिक सुरक्षा संवादाचे आयोजन करणार आहे