- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर राहतील. आपल्या या दौऱ्यात ते पाच हजार कोटींपेक्षा जास्त योजनांचे लोकार्पण करणार आहेत. तसेच ते वाराणसी येथे आत्मनिर्भर स्वस्थ भारत या देशव्यापी योजनेचा शुभारंभ करणार आहेत.
- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ctet.nic.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छुक अर्ज करु शकतात. 20 भाषेत ही परीक्षा होणार आहे.
- दिल्ली विद्यापीठाची तिसरी कटऑफ यादी जाहीर -
दिल्ली विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी तिसरी कटऑफ यादी जाहीर झाली. यानंतर 18 ऑक्टोबर 2021पासून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. आज शुल्क जमा करण्याचा शेवटचा दिवस आहे.
- SBIमध्ये 2056 पदांसाठी भरती -
SBIमध्ये 2056 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. यासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. sbi.co.inयाठिकाणी जाऊन इच्छुक याबाबत जाहिरात पाहू शकतात. तर www.sbi.co.in/careersया संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल.
- क्रिकेटपटू उमेश यादव याचा वाढदिवस -
आज भारतीय क्रिकेटपटू उमेश यादव याचा वाढदिवस आहे. उमेश यादव याचा जन्म 25 ऑक्टोबर 1987मध्ये झाला. मे 2010मध्ये त्याने झिम्बॉब्वे विरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते.
- दुबई -टी-20 विश्वचषकाच्या 16 व्या सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान संघामध्ये महामुकाबला झाला. यात भारताने दिलेले धावसंख्येचे लक्ष्य पाकिस्तानच्या संघाने सहज पार केले आणि ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने कर्णधार कोहलीच्या 57 व रिषभ पंतच्या 39 धावांच्या बळावर 20 षटकांत 151 धावा धावफलकावर लावल्या होत्या. हे आव्हान पाकिस्तानच्या संघाने सहजरित्या पूर्ण केले.
वाचा सविस्तर -IND Vs Pak T20 : पाकिस्तानच्या बाबरच्या संघाने केली कमाल; भारतावर 10 गडी राखून सहज विजय
- मुंबई -एनसीबीचेझोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून विनंती केली आहे. कोणीही छुप्या हेतूने मला दोषी ठरवण्यासाठी तातडीची कायदेशीर कारवाई करणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी विनंती समीर वानखेडे यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे.
वाचा सविस्तर -माझ्यावर छुप्या हेतूने कायदेशीर कारवाई होणार नाही याची खात्री करा, समीर वानखेडेंची पोलिसांना विनंती
- मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज रविवारी 24 ऑक्टोबरला 1410 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 18 मृत्यूंची नोंद झाली असून 1520 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.46 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
वाचा सविस्तर -Corona Update - राज्यात 1410 नवे रुग्ण, 18 रुग्णांचा मृत्यू
- अमरावती -येणाऱ्या काळात आरोग्य हेच सर्वोच्च प्राधान्य मानून उत्तम उपचार सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात कमी दरात उपचार उपलब्ध असतात व गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळतो. त्यामुळे अशा रुग्णालयात प्रगत व अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी अशा संस्थांनी पुढाकार घ्यावा. त्यांचा हा पुढाकार फार मोलाचा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते रविवारी अमरावती येथे बोलत होते.
वाचा सविस्तर -गरीबांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयांचा पुढाकार मोलाचा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
- मुंबई - शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आम आदमी पक्षाचे उमेदवार धनंजय शिंदे यांचा दारुण पराभव केला. निवडणुकीत ३४ पैकी ३१ जणांनी मतदान केले. पवार यांना २९ तर शिंदे यांना केवळ २ मते मिळाली आहे.
वाचा सविस्तर -ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार
25 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता वाटेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य