महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

top news today etv bharat marathi
आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

By

Published : Oct 24, 2021, 6:10 AM IST

  • आज दिवसभरात
  • भारत पाकिस्तान टी20 सामना -

टी20 विश्वचषकात क्रिकेटमधील हायहोल्टेज भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघ पाकिस्तानच्या बाबर आझमच्या संघाशी भिडणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुकुंज मोझरीत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधीस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे भेट देणार आहे.

  • केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांचा आज वाढदिवस -

आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1974 रोजी हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर येथे झाला. सध्या केंद्रात असलेल्या मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रीय अर्थराज्यमंत्री पदाचा पदभार आहे.

  • सोलापूर भाजपची पत्रकार परिषद -

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे पंढरपूर दौऱ्यानिमित्त आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान अवताडे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची पत्रकार परिषद सकाळी ठीक 10.30 वाजता होणार आहे. शासकीय विश्रामगृह, लिंक रोड, पंढरपूर येथे ही पत्रकार परिषद होईल.

  • काल दिवसभरात -
  • नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनप्रमाणे आरोग्य क्षेत्राने सरकारसोबत मैलाचा दगड गाठला आहे. आम्ही पंतप्रधानांसमवेत आरोग्य क्षेत्र हे पुढे कसे नेता येईल व भविष्यात महामारीची तयारी कशी करायची याबाबत चर्चा केली आहे. आम्ही सतत क्षमता विस्तारत आहोत, अशी माहिती सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लशींच्या उत्पादकांशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांच्याशी संवाद साधला.

वाचा सविस्तर -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनप्रमाणे आरोग्य क्षेत्राने सरकारसोबत मैलाचा दगड गाठला - आदर पुनावालांची प्रतिक्रिया

  • नागपूर -क्रिकेट आणि दहशतवादाचा खेळ एकत्र खेळला जाऊ शकत नसल्याचे रामदेव बाबा म्हणाले. सध्याच्या परिस्थितीत भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना होणे राष्ट्रहित आणि राष्ट्रधर्माच्या विरुद्ध आहे. रामदेव बाबा नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता विमानतळावर पत्रकारांना प्रश्नांना उत्तरे देताना बोलत होते.

वाचा सविस्तर -क्रिकेट आणि दहशतवादाचा खेळ एकत्र खेळला जाऊ शकत नाही - रामदेव बाबा

  • मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट, तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आज शनिवारी 23 ऑक्टोबरला 1701 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 33 मृत्यूंची नोंद झाली असून 1781 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.46 टक्के, तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

वाचा सविस्तर -Corona Update राज्यात 1701 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 33 रुग्णांचा मृत्यू

  • पणजी (गोवा) -आपचे नेते मनिष सिसोदिया यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भाजप त्यांच्या अकार्यक्षम पद्धतीमुळे हटविणार, असा गौफ्यस्फोट केला होता. मात्र, राज्यात मुख्यमंत्री बदलाविषयी कोणताही निर्णय झाला नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

वाचा सविस्तर -डॉ. प्रमोद सावंतच गोव्याचे मुख्यमंत्री; आपच्या दाव्यानंतर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांचे स्पष्टीकरण

  • पिपरी-चिंचवड -शहरातील अटलांटा बेग या कंपनीत शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली होती. यात कंपनीचे तब्बल 50 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. ही घटना शनिवार रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास घडली. कंपनीतील रासायनिक मटेरियल जळाल्याने धुरांचे लोट काही किलोमीटर वरून दिसत होते. मात्र, अग्निशमन विभागाने दीड तासात आगीवर नियंत्रण मिळवलं.

वाचा सविस्तर -पिपरी-चिंचवडमध्ये भीषण आग; 50 लाखांचे नुकसान

  • वाचा आजचे राशीभविष्य -

24 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज भावंडांकडून फायदा होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details