महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Todays Top News in Marathi
Todays Top News in Marathi

By

Published : Jan 24, 2022, 5:46 AM IST

आज दिवसभरात -

  • आजपासून राज्यातील शाळा सुरु

राज्यातील शाळा आजपासून सुरु होणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत 20 जानेवारी रोजी घोषणा केली होती. त्यानुसार ज्याठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल, तिथे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. आजपासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

  • मोहन भागवत त्रिपुरा दौऱ्यावर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आजपासून चार दिवस त्रिपुराच्या दौऱ्यावर आहेत. 2017 नंतर त्यांचा हा दुसरा दौरा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन भागवत आगरतळा येथील सेवाधाम येथे मुक्काम करतील. या दौऱ्यादरम्यान ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत.

  • स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अटक वॉरंट वर सुनावणी

उत्तर प्रदेशातील माजी मंत्री आणि ओबीसी नेतने स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरुद्ध सुलतानपूर येथील विशेष एमपी-एमएलए कोर्टाने अटक वॉरंट वर जारी केले. त्यावर आज सुनावणी पार पडणार आहे. धार्मिक तेढ निर्माण होईल असे विधान केल्याप्रकरणी हे अटक वॉरंट मौर्य यांना जारी केले होते. स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत सपात सामील झाले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांना हे अटक वॉरंट जारी झाले होते.

  • क्लबहाऊस अॅप प्रकरणी कोर्टात सुनावणी

सुल्ली डिल प्रमाणे क्लबहाऊस अॅपवरील चॅट्सच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी 19 ते 22 वयोगटातील तीन तरुणांना हरियाणातून अटक केली होती. याप्रकरणातील 3 आरोपींना मुंबई न्यायालयाने 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. क्लबहाऊस अॅप मध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह बोलल्याचे आढळले होते. ते महिलांच्या शरीराच्या अवयवांचा लिलाव करण्याबद्दलही बोलले असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

आजचे राशीभविष्य -

काल दिवसभरात -

नेताजी सुभाषचंद्र बोस ( Netaji Subhas Chandra Bose ) यांच्या जयंतीनिमित्त देशभरात आज पराक्रम दिवस ( Parakram Diwas ) साजरा केला जात आहे. पराक्रम दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी ( PM Modi Parakram Diwas ) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण ( hologram statue of Netaji ) केले. इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा बसवण्यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नेताजींचा होलोग्राम पुतळा तयार करण्यात आला ( hologram statue of Netaji at India Gate ) आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाव न घेता भाजप, अमित शाह आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना धोकेबाज लोक अजिबात आवडत नव्हते. अशा लोकांना ते जवळही फिरकु देत नसायचे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ( CM Uddhav Thackeray ) भाजपला दूर करत काँग्रेस सोबत आले ते योग्यच केलं, या शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ( Congree State President Nana Patole Criticize BJP ) भाजपला टोला लगावला.

राज्यात लसीकरण (Corona Vaccination in Maharashtra) समाधानकारक असून, लसीची सक्ती नसली तरी आम्ही नागरिकांना विनंती करू. तसेच, त्यांना लस घेण्यास भाग पाडू, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. उद्यापासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा (School Reopen in Maharashtra) सुरु होत आहे. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती टोपे (Health Minister Rajesh Tope)यांनी दिली.

गोव्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्पल पर्रीकर यांनी पक्षाचा त्याग केला आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (Goa Assembly Election) आता श्रीपाद नाईक राहीले तर तेही अस्वस्थ आहेत. (Goa Assembly Election 2022) असे सांगत भारतीय पक्षाचे मुख्य चेहरे आज बाहेर पडत आहेत. आणि भ्रष्टाचाराचे, व्यभिचाराचे, खंडणीचे, आरोपी असणारे हौशे, नौसे-गौसे भारतीय जनता पक्षाचे चेहरे झाले आहेत असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details