आज दिवसभरात -
- भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका तिसरा एकदिवशीय सामना
कसोटीतील नामुष्कीनंतर एकदिवसीय मालिकाही गमावणारा भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रतिष्ठा राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. या लढतीत भारतीय संघात असंख्य बदल अपेक्षित असून आफ्रिका दौऱ्याची किमान विजयी सांगता करण्यासाठी भारताचे खेळाडू उत्सुक असतील.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटवर बोस यांचा पुतळा बसवणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्रामचं अनावरण पंतप्रधान करणार आहेत. ग्रॅनाइटच्या पुतळ्याचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा होलोग्राम दाखवण्यात येणार आहे. दिल्लीतल्या इंडिया गेटजवळच्या 'अमर जवान ज्योति' स्मारकाजवळ अखंड तेवणारी ज्योत आज कायमची शांत करण्यात येईल. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा पुतळा बसवला जाणार आहे.
- महाराष्ट्र राज्यसेवा पूर्वपरिक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आज पार पडणार आहे. 2 जानेवारील ही परीक्षा होणार होती. राज्यात रुग्णसंख्या वाढल्याने पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, 23 जानेवारील ही परीक्षा होणार असल्याचे आयोगाकडून एक प्रसिद्धी पत्रक काढून सांगण्यात आले होते. तसेच, या पत्रात परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी देखील काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. सोबत परीक्षेचे प्रवेशपत्र देखील जाहीर करण्यात आले आहेत.
- प्रजासत्ताक दिनास सुरुवात
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंत्तीनित्ताने आजपासून प्रजासत्ताक दिनास सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला होता. मोदी सरकार देशाच्या इतिहास आणि संस्कृतीतील महत्त्वाच्या बाबींचा सन्मान आणि उत्सव करण्यावर भर देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या कालावधीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.