महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर - Todays latest marathi news

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Todays Top News in Marathi
Todays Top News in Marathi

By

Published : Jan 22, 2022, 5:55 AM IST

आज दिवसभरात -

  • राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात पश्चिमी प्रक्षोभ जाणवत असून त्यामुळे वायव्य भारतात म्हणजेच राजस्थानजवळ सिस्टिम तयार झाली आहे. त्याचा परिणाम होऊन अरबी समुद्राकडून येणारे आद्रतायुक्त वाऱ्याचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे 22 आणि 23 जानेवारीला कोकण आणि महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

  • 22 जानेवारी पर्यंत रॅली आणि रोड शोला बंदी

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पाच राज्यांत 22 जानेवारी पर्यंत रॅली आणि रोड शो ला बंदी घातली आहे.

  • औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक निवडणूकीसाठी मतदान

देवगिरी महानंद या नावाने मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. जिल्हा सहकारी दूध संघाची ही निवडणूक 14 संचालक पदांसाठी होत असून यासाठी 346 मतदार आहेत.

  • उपमुख्यमंत्री अजित पवार साधणार सरपंचाशी संवाद

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. रोज पाच हजारांवर रुग्णसंख्या आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज कोरोनाबाबत जिल्ह्यातील सर्व सरपंचाशी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

आजचे राशीभविष्य -

काल दिवसभरात -

पणजी मतदारसंघातून मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी घोषणा केली आहे.पणजीऐवजी बिचोलीतून उमेदवारी घ्यावी हा भाजपचा प्रस्ताव उत्पल पर्रिकर यांनी नाकारला असून आता ते पणजीतून अपक्ष निवडणूक लढणार आहेत. तशा प्रकारची घोषणा त्यांनी केली आहे. उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe ) यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका करून पुन्हा एकदा गोडसेचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केला असून काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या मारकऱ्याचे उदात्तिकरण कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole to Amol Kolhe) यांनी दिला आहे.

मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी कोरोना आणि ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावाबाबत (Corona Overview) आज आढावा घेतला. हा आढावा घेतल्यानंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयं सुरू (Colleges Reopen) करण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव ( Covid Third Wave ) वाढत असताना मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) केंद्र सरकार, राज्य सरकार व मुंबई महापालिकेला नागरिकांसाठी बूस्टर डोस ( Covid Prevention Booster Dose ) देण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले ( Submit Affidavit Regarding Booster Dose HC Directions ) आहेत. १० दिवसात हे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.

मनसुख हत्या (Mansukh Hiren Murder Case) आणि अँटिलिया प्रकरणाबाबत ( Antilia bomb scare case ) एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सचिन वाझे पुन्हा अनिल देशमुख यांची उलट तपासणी ( Sachin Waze on Anil deshmukh ) करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details