आज दिवसभरात -
- शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते प्राचार्य एन. डी. पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार
शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते प्राचार्य एन. डी. पाटील यांच्यावर आज दुपारी दोन वाजता कसबा बावडा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी 1 पर्यंत प्रा. एन. डी. पाटील यांचे पार्थिव सदर बाजार येथील शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. कोरोनाच्या नियमानुसारच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
- राज्यात आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान
राज्यातील 95 नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका, 2 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे. या मतदानासाठी संबंधित मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्यासाठी सार्वजनिर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
- अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याबाबत दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. आज त्यांच्या जामीन अर्जावर विशेष पीएमएलए कोर्ट निर्णय आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना आज यांना दिलासा मिळतो की नाही, हे महत्त्वाचे असणार आहे.
- सर्वात मोठा लघुग्रह आज पृथ्वीच्या जवळून जाणार
अॅस्टरॉइड म्हणजे लघुग्रह. हे लघुग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात. आज असाच सर्वात मोठा लघुग्रह पृथ्वीपासून 1.2 मिलियन अंतरावरून जाणार आहे. या लघुग्रहाचे नाव 7482 (1994 PC1) असे असून, त्याची रुंदी 3 हजार 551 फूट आहे. नासानं या गोष्टीमुळे पृथ्वीला धोका असू शकतो, असे म्हणले आहे.