महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Todays Top News in Marathi : आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर - आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

आजच्या टॉप न्यूज
आजच्या टॉप न्यूज

By

Published : Jan 13, 2022, 6:01 AM IST

आज दिवसभरात -

  • भाजपातील पडझड रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः मैदानात..

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा उत्साह वाढला ( Uttar Pradesh Assembly Elections ) आहे. उत्तर प्रदेशात अनेक नेते भाजप सोडून जात असताना आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही पडझड थांबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने १०० हून अधिक नेत्यांची तिकिटे फायनल केली आहेत. दरम्यान, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक गुरुवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली ( BJP Election Committee Meeting ) आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप १७७ उमेदवारांची पहिली यादी १६ किंवा १७ जानेवारीला जाहीर करू ( BJP Candidate List UP Election ) शकते.

  • अनिल देशमुखांच्या अर्जावर आज सुनावणी

100 कोटी कथित वसुली प्रकरणात ( 100 crore extortion case ) माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थर रोड तुरुंगामध्ये आहेत. अनिल देशमुख यांनी वकिलामार्फत 4 जानेवारी जामीनकरिता मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर मंगळवार (दि.11) रोजी सुनावणी झाली. यावेळी अनिल देशमुख यांचे वकील अनिकेत निकम ( Anil Deshmukhs advocate Aniket Nikam ) यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन दिला नाही. या अर्जावर आज 13 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

  • पंतप्रधान मोदींचा सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद

देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये मोदी हे मुख्यमंत्र्यांकडून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतील. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ते आढावा घेणार आहेत. सरकारी निर्बंध व रुग्णसंख्येची वाढ यासंदर्भात सविस्तर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना राज्याच्या परिस्थितीबाबत स्वागत करतील.

  • नितेश राणेंच्या जामिनावर आज निर्णय?

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर अखेर नितेश राणे यांनी ( Sindhudurg session court rejected Rane bail ) 3 जानेवारी जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. संतोष परब हल्ला प्रकरणात शुक्रवारी 7 जानेवारीला नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. या सुनावणीत नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. ( Nitesh Rane not relieved by Mumbai High Court ) नाही. यानंतर बुधवारी या प्रकरणावर सुनावणी झाली असून, त्यानंतर कामकाज तहकूब झाले आहे. नितेश राणे यांच्या वकिलांकडून बुधवारी युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणी आता आज पुन्हा एक वाजता सुनावणी होणार आहे.

आजचे राशीभविष्य -

काल दिवसभरात -

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची तयारी सुरू आहे का? तेच सर्व आंदोलक संघटनांशी चर्चा करत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी ( Chandrakant Patil slammed Sharad Pawar ) केली. ते शहरात ( Chandrakant Patil press in Kolhapur ) माध्यमांशी बोलत होते. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी म्हणजे घातपात करण्याचा डाव होता, असाही दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केला आहे.

मुंबई - मुंबईतील पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. तसेच कोविडमुळे शाळा बंद झाल्याने शालेय बससाठी करमाफी, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापक भरती आदी महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जळगावस्थित शिक्षण संस्थेमध्ये वर्चस्वासाठी वाद सुरू ( case against Girish Mahajan ) आहे. गिरीश महाजनांच्या सांगण्यावरून धमकावल्याचा याचिकार्त्यांच्या आरोप आहे. या प्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस चौकशी करत ( Kothrud Police Station probe of Girish Mahajan ) आहेत. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे संबंधित पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी 24 जानेवारीला होणार आहे.

मुंबई - भायखळा येथील गर्दीचे ठिकाण असलेल्या मदनपुरा येथील गोडाऊनला बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास आग ( Byculla Fire Broke Out ) लागली. या आगीवर तब्बल ४ तासांनी नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

पुणे - खडकी परिसरात देखील बुली बाईसारखं प्रकरण (Bulli Bai case) घडल्याची माहिती समोर येत आहे. परिसरातील महिलांचे व मुलींचे फोटो काढत ते अश्लील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खडकी पोलीसांनी एका तरुणाला अटक केली आहे. खडकीत राहत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाने हे कृत्य केले असून ९ जानेवारी रोजी हा प्रकार घडला आहे. खडकी पोलीस स्टेशनमध्ये १० जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details