- आज दिवसभरात
- आर्यन खान प्रकरण -
मुंबई - अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढला आहे. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असल्याचे आर्यन खानच्या वकिलांनी सांगितले आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
- सिद्धार्थ शुक्ला-शहनाज गील गाणं
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे काही दिवसांपूर्वीच निधन झालं. यानंतर सिडनाज म्हणजेच सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गील यांच शेवटचं गाणं अधुरा हे आज रीलिज होत आहे. श्रेया घोषाल ने हे गाणे गायलं आहे. प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्साह आहे.
- जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत दिग्गजांच्या अर्जांवर हरकतींचा पाऊस, आज होणार फैसला
जळगाव -जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांवर बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान भाजप खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हरकतींवर सुनावणी प्रक्रिया घेऊन, निकाल राखून ठेवले आहेत. गुरुवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता उमेदवारांच्या वैध-अवैध अर्जांची अधिकृत घोषणा होणार आहे.
- एसएससी स्टेनो परीक्षा 2021 -
एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डीसाठी स्कील टेस्ट आजपासून सुरू होत आहे. परीक्षार्थी https://ssc.nic.in/ येथे जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात.
- हेलन यांचा वाढदिवस -
सुप्रसिद्ध अभिनेत्री हेलन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या जन्म 21 ऑक्टोबर 1939मध्ये झाला. त्यांनी 60, 70 आणि 80च्या दशकात अनेक चित्रपटांच्या माध्यमातून अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केले.
- काल दिवसभरात -
- पुणे - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. यातच राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. तर याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर ईटीव्ही भारत प्रतिनिधीने रूपाली चाकणकर यांच्याशी संवाद साधला.