- मुंबई -पेट्रोलच्या दरवाढीच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे. राज्याचे विविध प्रकारचे कर असतात. ते कर वाढले, तर इंधनाचे दर वाढतात. तसेच गुजरात, कर्नाटक या राज्यात आपल्यापेक्षा पेट्रोल स्वस्त आहे. केंद्र या राज्यांना स्वस्त आणि आपल्याला महाग पेट्रोल देते, असे होत नाही, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.
सविस्तर वाचा-LIVE UPDATE : अर्थसंकल्पीय अधिवेशन; राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरूवात
- अमरावती -जिल्ह्यात १० दिवसांपूर्वी लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आली आहे. तसेच शहरात फर्जी कोरोना टेस्ट लॅब सुरू केल्या आहेत. यात मोठा काळाबाजार आहे. प्रत्येक बेडमागे १० हजार रुपये घेण्यात येत असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. तसेच सरकारने स्वत:चे अपयश लपवण्यासाठी लॉकडाऊन लावला असून त्यामुळे अमरावतीचे नाव बदनाम होते आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन हटवावे, अशी आमदार राणा यांनी विधानसभेत मागणी केली आहे.
सविस्तर वाचा-CORONA UPDATE : सोमवारी राज्यात 6397 रुग्णांची नोंद; 30 रुग्णांचा मृत्यू
- मुंबई - टीआरपी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी बीएआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दासगुप्ता यांना २ लाख रुपयांच्या बाँडवर आणि अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन शर्तीचा एक भाग म्हणून दासगुप्ता यांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत सहा महिन्यांसाठी हजेरी देणे आवश्यक असेल.
सविस्तर वाचा-टीआरपी घोटाळा : पार्थो दासगुप्ता यांना जामीन मंजूर
- वाशिम - पूजा चव्हाण हीच्या कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चित्र वाघ, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, शांताबाई चव्हाण यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रीय बंजारा परिषदचे युवा जिल्हा अध्यक्ष श्याम राठोड यांनी या संदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता तक्रार दाखल करून घेतली. परंतु आता ती तक्रार मागे घेण्यात आली आहे. आधीच वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर वाशिम पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. आता पोलिसांकडून अजून एक चूक झाल्याचे दिसून येत आहे. मानोरा पोलिसांनी दिलेल्या अर्जाची तपास न करता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून ते रद्द करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा-पूजा चव्हाण प्रकरण: फडणवीसांसह भाजपच्या या नेत्यांविरुद्ध दाखल तक्रार मागे
- मुंबई -12 ऑक्टोबर 2020 यादिवशी लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अचानक वीज गेल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली होती. मात्र, या ब्लॅक आउटमागे विशेष सायबर हल्ला झाल्याची शक्यता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्तवली आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.