नवी दिल्ली -आयुष मंत्रालय 2016 पासून दरवर्षी धनत्रयोदशीच्या निमित्ताने 'आयुर्वेद दिवस' साजरा करते. यंदा आज म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाचव्या आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने दोन आयुर्वेद संस्था देशाला समर्पित केल्या. गुजरातच्या जामनगरमधील भारतीय आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन (आयटीआरए) आणि राजस्थानमधील जयपूरची राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचे त्यांनी आज उद्घाटन केले. यावेळी त्यांनी देशवासीयांना संबोधित केले. आयुर्वेद हा देशाच्या आरोग्य धोरणाचा महत्त्वाचा हिस्सा आहे, असे ते म्हणाले.
सविस्तर वाचा -आयुर्वेद दिवस : 'देशाच्या आरोग्य धोरणामध्ये आयुर्वेदाचा महत्त्वाचा वाटा'
इस्लामाबाद -पाकिस्तानने 1 हजार 210 मोस्ट वाँडेट दहशतवाद्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आंतकवाद्यांचा समावेश आहे. ही यादी केंद्रीय तपास संस्थेच्या (एफआयए) दहशतवादीविरोधी पथकाने जारी केली आहे. या यादीत लंडनमध्ये वास्तव्यास असलेले मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) चे नेता अल्ताफ हुसैन आणि मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे कार्यकर्ता नासिर बट्ट यांचाही समावेश आहे
सविस्तर वाचा -पाकिस्तानकडून 1 हजार 210 मोस्ट वाँडेट दहशतवाद्यांच्या नावांची यादी जाहीर
मुंबई - दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून लवकरच न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे. दिशा एकेकाळी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर म्हणून काम पाहत होती. दिशा सालीयन हिने 8 जून रोजी तिने राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. यानंतर दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते.
सविस्तर वाचा -दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस दाखल करणार क्लोजर रिपोर्ट
औरंगाबाद- दिवाळीच्या रणधुमाळीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राजकीय फटकेबाजीची आतिषबाजी ऐकायला मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणाचा बाप काढू शकत नाही, त्यामुळे त्यांनी माझा बाप काढला, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर भाषणात केली.
सविस्तर वाचा -पहिले दाऊदचा बाप काढायचे, मग नवाज शरीफचा, आता हिंदुत्व गेल्याने आमचा बाप काढावा लागतो..
मुंबई - युरोपीय देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर सुरू केला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा उद्रेक अधिक गंभीर आहे. ही लाट आपल्या देशात येत्या काही महिन्यांमध्ये येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने युद्धपातळीवर पूर्वतयारी सुरू केली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात अनेक प्रकारच्या खबरदारी घेण्याचे आदेश जारी केले आहेत.
सविस्तर वाचा -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वीच युद्धपातळीवर तयारी; सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले 'हे' आदेश