मुंबई - केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत अधिक जास्तीची मदत केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सविस्तर वाचा -'लसीकरणासंदर्भात महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या नेत्यांनी कांगावा करू नये'
ठाणे- शहरातील वर्तक नगर भागातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन संपल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मृत रुग्णांचे नातेवाईक संतापले असून पालिका अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
सविस्तर वाचा -ठाण्यात ऑक्सिजन संपल्याने सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
गडचिरोली -नक्षलवाद्यांनी आज 26 एप्रिलला भारत बंद पुकारलेला आहे. या पार्श्वभूमीवर मध्यरात्री अहेरी तालुक्यातील मेडापल्लीत चार ट्रॅक्टर व पाणी टँकरला नक्षलवाद्यांनी जाळून टाकले आहे. आलापल्ली पेरमिलीमध्ये मेडपल्ली पासून तुमीरकसा या गावात रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी आणलेल्या वाहनांना नक्षलवाद्यांनी आग लावून दिली. या घटनेमुळे परिसरात सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी बॅनर लावले असून त्यामध्ये पेरमिली एरीया कमेटी माओवादी असा उल्लेख केलेला आहे. - सविस्तर वाचा
मुंबई- मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टिकेची झोड उठली आहे. भाजप आमदार गोपीनाथ पडळकर यांनी देखील, वाटाघाटी, टक्केवारीसाठी जनतेच्या हिताचा निर्णय मागे घेऊ नये, असे सुनावत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
मुंबई- राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील लोकांना सरकार मोफत ‘कोरोना’ लस देणार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसने घोषणा केली. मात्र मोफत लसीबाबतचे अधिकृत धोरण उच्चाधिकार समिती ठरवणार आहे, असे ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. यामुळे लस मोफत मिळणार की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सविस्तर वाचा - मोफत लसीबाबतचे धोरण उच्चाधिकार समिती ठरवणार, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे संभ्रम
मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट उग्र रुप धारण करत आहे. रोज सरासरी 60 हजार रुग्णांची राज्यात नव्याने नोंद होत आहेत. असं असलं तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे, ही समाधानाची बाब आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीकडे नजर टाकली असता ही बाब आपल्याला जाणवते. 23 एप्रिल रोजी कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 74 हजार पार झाली होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे वाढणारी चिंता ही मात्र कमी झाली आहे. एक नजर टाकूया दहा दिवसात बरे झालेल्या रुग्ण संख्येच्या आकडेवारीवर -