महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - आजच्या 10 ठळक बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top-10-at-9-am
Top 10 @ 9 PM : रात्री नऊ वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या..!

By

Published : Dec 31, 2020, 10:13 AM IST

Updated : Jan 1, 2021, 12:08 AM IST

  • बीजिंग - चीनमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीसोबतच, आकर्षक रोषणाई आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते.

सविस्तर वाचा :जगभरात नववर्षाला सुरुवात; पाहा देश-विदेशातील LIVE अपडेट्स..

  • औरंगाबाद -किमान समान कार्यक्रमात संभाजीनगरचा मुद्दा नाही, नाव बदलून विकास होत नाही. समन्वय समिती आहे, त्या समोर आले तर पाहू. आम्ही सर्वसमान कार्यक्रम अंतर्गत काम करत आहोत. त्यामुळे, शहराचे नाव बदलण्यास आमचा विरोध राहणारच आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा :'संभाजीनगर' ला काँग्रेसचा पाठिंबा नाहीच; बाळासाहेब थोरातांनी मांडली काँग्रेसची भूमिका

  • नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. राजधानी दिल्लीत न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवन आणि संसद परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण संसद परिसर उजळून निघाला आहे. कोरोना महामारीमुळे नव्या वर्षाच्या स्वागतावर बंधने आली असून अनेक राज्यांनी नाईट कर्फ्यू लागू केला आहे. मात्र, तरीही २०२१ च्या स्वागतासाठी संपूर्ण देशात जल्लोष पाहायला मिळत आहे.

सविस्तर वाचा :वेलकम २०२१ : राष्ट्रपती भवनासह संसद परिसरात आकर्षक रोषणाई

  • नवी दिल्ली - केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी आज (गुरुवार) केंद्रीय माध्यमिक बोर्डाच्या (सीबीएसई ) दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. दहावी बारावीच्या परीक्षा ४ मे पासून सुरू होणार आहेत. तर निकाल १५ जुलैला जाहीर करण्यात येतील, अशी घोषणा पोखरियाल यांनी केली. कोरोनाच्या पाश्वभूमीवर यावर्षी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा :सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ४ मे पासून होणार, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

  • मुंबई -आज २०२० या वर्षाला निरोप देण्यासाठी जगभरातील नागरिक सज्ज झाले आहेत. कोरोना महामारीने ग्रासलेल्या या वर्षात 'जग'जीवन विस्कळीत झाले होते. संपूर्ण वर्षभर लॉकडाऊन आणि मृत्यूच्या सावटाखाली हे वर्ष घालवल्यानंतर आज २०२१ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जनता सज्ज झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण पर्यटन स्थळावर जाण्यास ईच्छूक असतात. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी अशा ठिकाणी बंदी गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला असला तरी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी आपपल्या परीने तयारी केल्याचे चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने घेतलेला काही घडामोडींचा आढावा..

सविस्तर वाचा : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत... राज्यातील लाइव्ह घडामोडी...

  • कोल्हापूर - नविन वर्षाच्या सुरुवातीलाच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांना भेट दिली आहे. कारण उद्यापासून अंबादेवी मंदिराच्या महाद्वारातून आत येत मुखदर्शन घेता येणार आहे. मंदिर दर्शनासाठी खुले केल्यापासून केवळ एकच दरवाजामधून भाविकांना आतमध्ये येता येत होता. मात्र, आता महाद्वार सुद्धा उघडल्याने भाविकांना मुखदर्शन सुद्धा घेता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी ही माहिती दिली आहे.

सविस्तर वाचा :कोल्हापूर : उद्यापासून अंबादेवी मंदिराचे महाद्वार उघडणार

  • मुंबई- अमेझॉन कंपनीशी लढाई जिंकल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पिझ्झा कंपनीमध्ये अग्रेसर असणाऱ्या डोमिनोज पिझ्झाकडे लक्ष्य केंद्रित केल आहे. 'मराठी नाही तर डोमिनोज पिझ्झा नाही', ही मोहीम मनसेच्या मुनाफ ठाकूर यांनी सुरू केली होती. डोमिनोज पिझ्झाने त्यांची मागणी मान्य करत अ‌ॅपमध्ये मराठीचा समावेश करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे ठाकूर यांनी सांगितले आहे.

सविस्तर वाचा :अ‌ॅमेझॉननंतर 'डॉमिनोज'ही मराठीचा वापर करणार, मनसेची मागणी मान्य

  • श्रीनगर- बुधवारी झालेल्या चकमकीमध्ये तीन अतिरेक्यांना ठार केल्याचा दावा सुरक्षा दलाकडून करण्यात आला आहे. मात्र आमची मुले निर्दोष असून, त्यांना एका बनावट चकमकीमध्ये मारण्यात आल्याचं मृतांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. बारामुला परिसरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी एका घराला घेराव घातला, यावेळी दोन्ही बाजूने झालेल्या गोळीबारामध्ये तीन दहशतवादी मारले गेले.

सविस्तर वाचा :जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 दहशतवादी ठार

  • सातारा - महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटात चालकाचा ताबा सुटल्यामुळे तीव्र वळणावर बस उलटून 15 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

सविस्तर वाचा :महाबळेश्वरजवळील पसरणी घाटात बस उलटली, सुदैवाने जीवित हानी नाही

  • हैदराबाद -कोरोना महामारीने २०२० वर्षात संपूर्ण जगाला जेरीस आणलं. त्यातून भारतही सुटला नाही. मात्र, आरोग्य क्षेत्रापुरतेच हे संकट मर्यादित राहिले नाही. व्यापार, शिक्षण, पर्यावरण, अर्थव्यवस्थेलाही कोरोनाची झळ पोहचली. हे कमी म्हणून चीनच्या आक्रमक भूमिकेमुळे देशाची सुरक्षाही धोक्यात आली. नववर्षाचे सर्वजण जल्लोषात स्वागत करतील. मात्र, देशासमोरील संकटे एका दिवसात संपणार नाहीत. २०२१ मध्ये भारतासमोर कोणती मोठी संकटे असतील याचा ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा...

सविस्तर वाचा :नव्या वर्षात भारतापुढे 'ही' आहेत मोठी आव्हाने; जाणून घ्या एका क्लिकवर

Last Updated : Jan 1, 2021, 12:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details