महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tokyo Olympics Day 11: 2 ऑगस्टचे वेळापत्रक, भारत या सामन्यांमध्ये दाखवेल ताकद - भारत श्रावणच्या दुसऱ्या सोमवारी

भारताच्या खात्यात आता दोन पदके आहेत. बॉक्सिंगमध्येही एक पदक निश्चित झाले आहे. महिला बॉक्सर लव्हलीना बोर्गोहेनने उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचबरोबर पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. ग्रेट ब्रिटनला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष हॉकी संघाने चार दशकांनंतर ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली आहे.

Tokyo Olympics Day 11
Tokyo Olympics Day 11

By

Published : Aug 1, 2021, 10:20 PM IST

हैदराबाद -भारताच्या खात्यात आता दोन पदके आहेत. बॉक्सिंगमध्येही एक पदक निश्चित झाले आहे. महिला बॉक्सर लव्हलीना बोर्गोहेनने उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचबरोबर पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. ग्रेट ब्रिटनला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष हॉकी संघाने चार दशकांनंतर ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सोमवारी भारताचा दावा अॅथलेटिक्स ट्रॅकपासून हॉकीपर्यंत दिसून येईल. यादरम्यान अनेक खेळांचे इव्हेंट होतील. 2 ऑगस्ट रोजी जर भारताला पदक जिंकण्याची संधी असेल, तर अनेक खेळांमध्ये पदकाच्या आणखी एक पाऊल जवळ येण्याची आशा निर्माण होईल. जर सोमवारी भारताने टोकियोमध्ये आपल्या सर्व सामर्थ्याने खेळ केला, तर त्याचा परिणाम पदकांच्या आकडेवारीपासून ते तिरंग्याचा मान आणि सन्मानापर्यंत प्रत्येक गोष्टीवर दिसून येईल.

हेही वाचा- Tokyo Olympics : चक दे इंडिया! ग्रेट ब्रिटनचा धुव्वा उडवत भारतीय पुरूष हॉकी संघ उपांत्य फेरीत

अॅथलेटिक्स हा सुरुवातीच्या खेळांपैकी एक असेल जिथून भारत 2 ऑगस्ट रोजी आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. येथे भारताच्या दुती चंद महिलांच्या 200 मीटर स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्रता फेरीत धावताना दिसतील. जी भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता असेल.

आतापर्यंत जपानमधील ओसाका शूटिंग रेंजमधून भारतासाठी निराशाजनकच बातमी आली आहे. त्यामुळे आता 2 ऑगस्ट रोजी नवीन दिवसासह नवीन आशा असेल. भारताचे दोन रायफलमन संजीव राजपूत आणि ऐश्वर्या तोमर सोमवारी 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सहभागी होताना दिसतील.

हेही वाचा- Tokyo Olympics : जय हो! भारताला आणखी एक पदक; पी. व्ही. सिंधू कांस्य पदकाची मानकरी

या स्पर्धेची पात्रता फेरी भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजता होणार आहे. तर अंतिम फेरी दुपारी 1 वाजता होणार आहे. याशिवाय 2 ऑगस्ट रोजी भारताच्या महिला हॉकी संघाचा उपांत्यपूर्व सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. हा एक मोठा सामना आहे.

2 ऑगस्ट रोजी भारताचे वेळापत्रक असे असेल

जर भारतीय महिलांनी हा सामना जिंकला, तर ते पदकाच्या आणखी एक पाऊल जवळ येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 8:30 पासून होणार आहे.

कमलप्रीत करु शकते कमाल!

2 ऑगस्टच्या संध्याकाळी टोकियोच्या अॅथलेटिक्स फील्डमधून मोठी बातमी येऊ शकते. भारताची कमलप्रीत कौर, जी येथे आपले पहिले ऑलिम्पिक खेळत आहे, ती महिला डिस्कस थ्रो इव्हेंट पदक जिंकण्याची मोठी दावेदार आहे.

हेही वाचा -Greatest PV Sindhu : सिंधू 2 ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

पात्रता फेरीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या कमलप्रीतच्या पदकाचा रंग काय असेल? हे सोमवारी संध्याकाळीच कळेल. टोकियोमधील ट्रॅक अॅण्ड फील्ड एरिना येथे महिला डिस्कस थ्रो फायनल संध्याकाळी साडेचार वाजता सुरू होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details