औरंगाबाद- नातेवाईकांना भेटण्यासाठी लाहोरला गेल्यावर पासपोर्ट हरविल्यामुळे तुरुंगवासात गेलेल्या एक 65 वर्षीय आजी तब्बल 18 वर्षांनंतर मायभूमीत परतल्या आहेत. हसीना दिलशाद अहमद असे या आजींचे नाव असून औरंगाबादमध्ये त्या दाखल झाल्या आहेत. देशात परतल्यानंतर अतिशय समाधान वाटत असल्याचे या आजींनी म्हटले आहे.
हैदराबाद - तेलंगाणा राज्यात अंगावर काटा आणणारी एक घटना समोर आली आहे. बायको पळून गेल्यानंतर एका व्यक्तीच्या मनात महिलांबद्दल राग उत्पन्न झाला होता. या रागातून त्याने तब्बल १८ महिलांची हत्या केली. माईना रामूलू असे या सिरियल किलरचे नाव असून त्याच्यावर २१ गुन्हे दाखल आहेत. हैदराबाद पोलिसांनी या मोस्ट वॉन्टेंड किलरच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नवी दिल्ली - ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावर कब्जा मिळवून झेंडा फडकावल्याच्या घटनेला केंद्रीय गृह मंत्रालयाने गांभीर्याने घेतले आहे. दिल्लीमधील विविध भागांत शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ले केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून गृहमंत्री अमित शाह आणि सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी निवासस्थानी बैठक घेतली.
पलवल -राजधानी दिल्लीत ज्या प्रमाणे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती तशी रॅली हरयाणातील पलवल येथही काढण्यात आली होती. रॅलीदरम्यान पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाल्यांतर आज पोलिसांनी सुमारे १ हजार अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक केली नाही.
- वाचा सविस्तर -हरयाणात एक हजार अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
न्युयॉर्क -राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. काल प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. दरम्यान, पंजाब हरयाणा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद जगात दिसून येत आहेत. अमेरिकेतील न्युयॉर्क आणि वॉशिंग्टन डी. सी शहरात खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढला होता.