महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - 23 sep

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Sep 23, 2021, 6:32 AM IST

आज 'या' बातम्यांवर असेल नजर -

  • मुंबईतील 67टक्के पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार दिल्याचे लीड सर्वेक्षणातून समोर आले आहे. प्राथमिक व माध्‍यमिक शाळांमधील विद्यार्थ्‍यांच्‍या 59 टक्‍के पालकांच्‍या मते मुलांचे शिक्षणासंदर्भात नुकसान होत आहे, सर्वेक्षणातून समोर आले आहे.
  • आज अभिनेता प्रेम चोप्रा यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1935 साली लाहोर (सध्या पाकिस्तानातील शहर) येथे झाला. त्यांना आतापर्यंत सुमारे 380 चित्रपटांत विविध भूमिका केल्या आहे.
  • अभिनेत्री अलका कुबल यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1963 साली मुंबईत झाला. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात अभिनय केला आहे. 1991 साली प्रदर्शित झालेल्या माहेरची साडी हा चित्रपटात अलका कुबल यांनी सूनेची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
  • IPL 2021 च्या सत्रातील आज 34 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, असा होणार आहे. सामन्याची सुरुवात सांयकाळी साडेसात वाजता होईल.
  • आज मुंबई, तळकोकण, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात मुसळधार पावसाची तर विदर्भात तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • मुंबई - राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडी सरकारनं बुधवारी (दि. 22 सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला आहे. या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येईल असंही सांगण्यात आले आहे. सविस्तर वाचा ...
  • मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी २ हजार ५८३, मंगळवारी ३ हजार १३१ रुग्ण आढळून आले होते. बुधवारी २२ सप्टेंबरला त्यात किंचित वाढ होऊन ३ हजार ६०८ रुग्ण आढळून आले आहेत. आज ४८ मृत्यूंची नोंद झाली असून ४ हजार २८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
  • मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देण्यात येईल. राज्य सरकार 27 टक्क्यांपर्यंत आरक्षण ठेवण्यास आणि एकूण आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, अशी सुधारणा करण्याचा अध्यादेश काढणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीत याला एक मताने मान्यता देण्यात आल्याचे ते म्हणाले. सविस्तर वाचा...
  • चंदीगड- पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेले अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग विरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याकरिता कोणताही त्याग करण्याची तयारी असल्याचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जाहीर केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीकरता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा केल्यास त्यांच्याविरोधात मजबूत उमदेवार देणार असल्याचेही कॅप्टन अमरिंदर यांनी जाहीर केले आहे. सविस्तर वाचा ...
  • नवी दिल्ली- कोरोना लसीकरण मोहिमेत भारताने नवा टप्पा गाठला आहे. देशातील नागरिकांच्या लसीकरणाचा आज 83 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ही माहिती केंद्री आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली आहे. सविस्तर वाचा ...

    मुंबई- कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांनी लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. राज्यात २१ सप्टेंबर रोजी सुमारे ३६ लाख कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस शिल्लक आहेत. ज्या जिल्ह्यांत कमी डोसेस दिले असतील त्यांनी लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. सविस्तर वाचा ...
  • मुंबई - राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येत्या रविवारी बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला दिल्लीला जाणार आहेत. राज्यात शिवसेना भाजप युतीच्या चर्चांना आलेला ऊत, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये रंगलेल्या लेटरवॉरमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री शाहांच्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. सविस्तर वाचा ...

जाणून घ्या आजचे राशीभविष्य-

आजची प्रेरणा : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी

अधिक बातम्यांसाठीयेथे क्लिक करा

ABOUT THE AUTHOR

...view details