मुंबई :
संजय राऊत यांच्या जामिनावर आज निर्णय - संजय राऊत त्यांच्या जामीन अर्जावर काल ईडीच्या वतीने युक्तिवाद पूर्ण करण्यात आला आहे. आज मंगळवार दिनांक 18 रोजी संजय राऊत यांच्यावतीने वरिष्ठ वकील अशोक मुंडरगी हे युक्तिवाद करणार ( Sanjay Raut Hearing ) आहे. सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उद्या वकील अशोक मुंडरगी उत्तर देणार असून उद्याला ठरणार आहे की संजय राऊत यांचे दिवाळी कारागृहामध्ये होणार की कुटुंबियांसोबत होणार त्यामुळे राऊत यांच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता(Rain Update Today) - आज म्हणजेच १८ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यासोबतच १९ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आणि मराठवाड्यात, तर २० ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.