- मुंबई : राज्यपालांचे अभिभाषण याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या प्रत्येक मुद्द्याला प्रत्युत्तर दिले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भाजपने केलेल्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला. "शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं नाही. बाबरी मशीद पाडली तेव्हा, येडे गबाळे पळून गेले मात्र बाळासाहेब उभे राहिले" अशी जळजळीत टीका त्यांनी विरोधकांवर केली. यासोबतच काश्मीरमध्ये पीडीपी सोबत मांडीला मांडी लावून सत्ता भोगली त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सविस्तर वाचा-'शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आमचं नाही, काश्मीरमध्ये सत्ता आणली तेव्हा हिंदुत्व कोठे गेलं होतं?'
- मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ,अनुराग कश्यप व विकास बहलच्या घरी आयकर विभागाच्या पथकाकडून धाडी मारण्यात आल्या आहेत. या तिघांच्या मुंबईतील निवासस्थानी व कार्यालयावरही छापेमारी सुरू असल्याची माहिती आयकर खात्याच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
सविस्तर वाचा-तापसी पन्नू, अनुराग कष्यप आणि विकास बहलच्या घरावर आयकर विभागाची धाड
- मुंबई- जळगाव जिल्ह्यातील एका शासकीय वसतिगृहात महिलेला आक्षेपार्ह अवस्थेत पोलिसांनी नाचायला लावले. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी ४ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
सविस्तर वाचा-जळगाव वसतिगृह प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार - गृहमंत्री अनिल देशमुख
- जळगाव -येथील वसतिगृहात दोन महिलांमधील वाद व वसतिगृहातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचे चौकशी पथक नेमले आहे. त्यात एक महिला अधिकारी, पोलीस अधिकारी, दोन तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. चौकशीत जे समोर येईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.
सविस्तर वाचा-वसतिगृह प्रकरण : वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या पथकाकडून चौकशी - जिल्हाधिकारी राऊत
- मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी माजी वनमंत्री संजय राठोड यांचे प्रकरण ताजे असताना आघाडी सरकारमधील आणखी एका नेत्याने आत्महत्या प्रकरणात एफआयआर बदलल्याचा धक्कादायक प्रकार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी परिषदेत उघडकीस आणला. तसेच याप्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली.
सविस्तर वाचा-महिलेल्या फसवलेल्या 'त्या' आमदाराची सीआयडी चौकशी करा - प्रविण दरेकर
- मुंबई- अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. युती तोडल्याच्या कारणावरून बोलताना त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. बंद दाराआड झालेली चर्चा बाहेर जाऊन त्यांनी वेगळ्याच प्रकारे सांगितली, असे ते म्हणाले. कोरोना केंद्रामध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप नाकारत महाराष्ट्राने कोरोनाची लढाई समर्थपणे लढली, आम्ही केले ते सर्व शून्य आहे, असे समजू नका, असे ते म्हणाले.