महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Todays Top News : दादासाहेब फाळके यांची पुण्यतिथी, तात्या टोपे यांची जयंती; वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - R. R. Patil death anniversary

Todays Top News : आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Todays Top News
Todays Top News

By

Published : Feb 16, 2022, 5:48 AM IST

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

  • तात्या टोपे यांची जयंती -तात्या टोपे ( Freedom Fighter Tatya Tope Birth Anniversary ) यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील येवल्यात पांडुरंगराव टोपे आणि रुखमाबाई यांच्या पोटी १८१४ मध्ये झाला होता. त्यांचे मुळनाव रामचंद्र पांडुरंग यावलकर असे होते. त्यांचे वडील बिथूर येथील निर्वासित पेशवा बाजीराव द्वितीय यांच्या दरबारातील प्रमुख प्रतिष्ठित होते. तात्या टोपे हे १८५७ च्या ( Rise of 1857 ) भारतीय उठावातील सर्वात महत्त्वाचे नेते होते. सविस्तर वाचा...
  • नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे जन्मलेले भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज पुण्यतिथी आहे.
  • माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची आज पुण्यतिथी आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता ऊर्जा आणि संसाधन संस्थेच्या (TERI) जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. ते या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • नवी दिल्ली: 2021 च्या लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील ( Red Fort violence case ) आरोपी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याचा हरियाणातील सोनीपतजवळ एका रस्ता अपघातात मृत्यू झाला ( Actor Deep Sidhu Died In Accident ) आहे. पोलिसांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. सिद्धूला 9 फेब्रुवारी 2021 रोजी हरियाणातील कर्नाल बायपास येथून अटक करण्यात आली होती. लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराचा कट त्याने रचला असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - हिंदी चित्रपटातीलबॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन ( hindi film Shahenshah Amitabh Bachchan ) यांच्या अतिशय जवळचा विश्वासू तसेच सर्व सुरक्षेची जबाबदारी असलेले हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे याला आज मुंबई पोलिसांनी निलंबित ( Amitabh Bachchan security Head Constable suspended ) केले आहे. जितेंद्र शिंदेवर विभागीय चौकशीदरम्यान दोषी आढळल्याने निलंबित करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई -नरवर नावाचा एक दूधवाला ५ वर्षात ७ हजार कोटींचा मालक झाला. तो कसा झाला? भाजप सरकार आल्यानंतर त्याचे येणे जाणे सुरू झाले. कुणी केले मनी लॉण्ड्रींग. यातील साडेतीन हजार कोटी महाराष्ट्रातून गेलेत. महाआयटीत २५ हजार कोटींचा घोटाळा (Scam in MahaIT) झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. तसेच मला त्रास देण्यासाठी माझ्या मित्रांना आणि कुटुंबियांना टार्गेट केले आज असल्याचे राऊत म्हणाले. सविस्तर व्हिडिओ पाहा...
  • मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेला ठाणे-दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचे ( Thane-Diva 5th and 6th railway line ) काम पुर्ण झाले आहे. बहुप्रतीक्षित या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे उद्घाटन येत्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नव्या मार्गिकेमुळे मध्य रेल्वे मार्गाच्या मुख्य मार्गावर ३४ वातानुकूलित लोकल सेवा ( 34 AC locomotives ) आणि दोन विना वातानुकुलीत (सामान्य) ( non-air-conditioned suburban services ) उपनगरीय सेवा वाढविण्यात येणार आहे.सविस्तर वाचा...
  • मुंबई- कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला ( SSC HSC Exams Maharashtra ) आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र अथवा उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले ( School there center or sub-center ) आहे. इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्र, उपकेंद्रांची संख्या 9 हजार 613 तर, इयत्ता दहावीसाठी परीक्षा केंद्र, उपकेंद्रांची संख्या 21 हजार 349 इतकी असणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ( Education Minister Varsha Gaikwad ) आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय शिक्षण विभागाने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. सविस्तर वाचा...
  • रांची- प्रसिद्ध चारा घोटाळा प्रकरणात सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना डोरंडा कोषागारातून अवैध पैसे काढल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. डोरंडा ट्रेझरीशी संबंधित या बहुचर्चित प्रकरणात आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह अनेकांना दोषी ठरवण्यात आले आहे. तर न्यायालयाने या प्रकरणात २४ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. 90 च्या दशकातील सर्वात मोठ्या घोटाळ्यात झारखंडमध्ये 53 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. ज्यामध्ये न्यायालयाने लालूंना दोषी ठरवलेले हे 52 वे प्रकरण आहे. या शिक्षेचा निकाल 21 फेब्रुवारीला सुनावण्यात येणार आहे. सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ABOUT THE AUTHOR

...view details