महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Petrol Diesel New Rates : महागाईच्या झळा! पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा सविस्तर - पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती काय आहेत

रोज पेट्रोल डिझेलचे नवे-नवे दर येत आहेत. आज काही प्रमाणात दर स्थिर आहेत. आज (दि. 14 एप्रिल)रोजी पेट्रोल-डिझेल कंपन्यांनी आजचे नवे दर जाहीर केले आहेत. (Petrol Diesel New Rates) देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईने हैराण करुन सोडले आहे.

पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर
पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर

By

Published : Apr 14, 2022, 9:48 AM IST

मुंबई - रोज पेट्रोलचे दर वाढतच चालले आहेत. नवे-नवे दर येत आहेत. आज काही प्रमाणात दर स्थिर आहेत. आज (दि. 14 एप्रिल)रोजी पेट्रोल-डिझेल कंपन्यांनी आजचे नवे दर जाहीर केले आहेत. (Today's new rates for petrol and diesel) देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईने हैराण करुन सोडले आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. तर, दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे.

डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरने विकले जाते - भारतीय तेल कंपन्यांनी 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणतीही दरवाढ केलेली नाही. पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जारी केलेल्या नव्या दरांनुसार, देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. (Today New Rates Petrol and Diesel In India) तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर, देशाच्या राजधानीचे शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरने विकले जात आहेत. तर, डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरने विकले जाते आहे.

डिझेलनंही शंभरी ओलांडली - एप्रिल महिन्यात सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. यापूर्वी गेल्या बुधवारी (6 एप्रिल) रोजी पेट्रोल-डिझेल दोन्ही इंधनाच्या दरांमध्ये 80 पैसे प्रति लिटरची वाढ करण्यात आली होती. (Petrol and Diesel In India) दरम्यान, 22 मार्चपासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 10 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. तरीही देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती 120 रुपये प्रति लिटर पार पोहोचल्या आहेत. तर डिझेलनंही शंभरी ओलांडली आहे.

रोज किंमती बदलतात -देशात 22 मार्चनंतर सातत्यानं पेट्रोल-डिझेलच्या दरांच्या वाढीचे सत्र सुरु होते. गेल्या 22 दिवसांत तेलाच्या किमतींमध्ये जवळपास 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात.

शहर पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)

मुंबई 120.51 104.77

दिल्ली 105.41 96.67

चेन्नई 110.85 100.94

कोलकाता 115.12 99.83

हैद्राबाद 119.49 105.49

कोलकाता 115.12 96.83

बंगळुरू 111.09 94.79

शहर पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)

मुंबई 120.51 रुपये 104.77 रुपये

पुणे 120.60 रुपये 103.28 रुपये

नाशिक 120.02 रुपये 102.73 रुपये

परभणी 123.51 रुपये 106.08 रुपये

औरंगाबाद 120.63 रुपये 103.32 रुपये

कोल्हापूर 120.64 रुपये 103.35 रुपये

नागपूर 121.03 रुपये 103.73 रुपये

हेही वाचा -Alia Ranbir Wedding : आली लग्नघडी! आलिया-रणबीर होणार आज विवाहबद्ध

ABOUT THE AUTHOR

...view details