महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Breaking News Live Page : ४६ व्या वर्षी प्रीति झिंटाने दिला जुळ्यांना जन्म, लग्नाच्या ५ वर्षांनी दिली Goodenough न्यूज

Maharashtra Breaking News
Maharashtra Breaking News

By

Published : Nov 18, 2021, 8:42 AM IST

Updated : Nov 18, 2021, 9:27 PM IST

21:25 November 18

एस टी महामंडळाचे 8 अधिकारी आंध्रप्रदेश, तेलंगणा अभ्यास दौऱ्यावर

मुंबई फ्लॅश

एस टी महामंडळाचे 8 अधिकारी आंध्रप्रदेश, तेलंगणा अभ्यास दौऱ्यावर

आंध्रप्रदेश, तेलंगणा येथे एसटीचे खासगीकरण कसे करण्यात आले याचा करणार अभ्यास

राज्यात सुरू असलेल्या एस टी कर्मचारी संपाच्या भूमिकेनंतर महामंडळाची चाचपणी सुरू

17:25 November 18

४६ व्या वर्षी प्रीति झिंटाने दिला जुळ्यांना जन्म, लग्नाच्या ५ वर्षांनी दिली Goodenough न्यूज

नई दिल्ली -बॉलीवुड अभिनेत्री प्रीति झिंटा (Bollywood Actress Preity Zinta) आणि पती जीन गुडइनफ (Gene Goodenough) यांंनी सोशल मीडियावर एक गुड न्यूज शेअर केली आहे. या कपलने सरोगेसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तिने स्वतः ट्वीटरवर (@realpreityzinta) ही गोड बातमी शेअर केली आहे.

16:41 November 18

मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात

मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात

गेल्या   दहा मिनिटे पासून पडतोय पाऊस

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात बदल

16:25 November 18

अमरावती संचारबंदी प्रकरण - शहरातील संचारबंदी शिथिलतेत पुन्हा फेरबदल

अमरावती ब्रेकींग

अमरावती संचारबंदी प्रकरण

शहरातील संचारबंदी शिथिलतेत पुन्हा फेरबदल

आता जीवनावश्यक वस्तू खरेदी व कृषी केंद्र उघडण्यास सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत तर दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत परवानगी

अमरावतीत संचारबंदी शिथिलतेबाबत संभ्रम

आधीच इंटरनेट बंद असल्याने नव्या नियमांची माहिती लोकांन पर्यंत पोहचत नाही

16:21 November 18

कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी कामगारांची जलसमाधी आंदोलनाची घोषणा

कोल्हापूर ब्रेकिंग

कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी कामगारांची जलसमाधी आंदोलनाची घोषणा

आंदोलनाच्या बाराव्या दिवशी एसटी कामगार आक्रमक

सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पंचगंगा नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा

उद्या सकाळी 11 वाजता पंचगंगा नदीत एसटी कामगार घेणार जलसमाधी

जिल्ह्यातील मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे एसटी कामगारांचा निर्णय

एसटी कामगारांच्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांची माहिती

15:34 November 18

ज्ञानदेव वानखडे यांच्या, नवाब मलिक यांच्या विरोधातील याचिकेवर निर्णय 22 नोव्हेंबरपर्यंत राखीव

ज्ञानदेव वानखडे यांच्या, नवाब मलिक यांच्या विरोधातील याचिकेवर निर्णय 22 नोव्हेंबरपर्यंत राखीव ठेवला
22 तारखेला हायकोर्ट अंतिम निर्णय देणार
आज दोन्ही बाजूने कागदपत्र सादर करण्यात आली

15:15 November 18

जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांना बाजूला करणे आपले कर्तव्य - शरद पवार

जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांना बाजूला करणे आपले कर्तव्य - शरद पवार

पवारांनी गडचिरोलीमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले मार्गदर्शन

देसाईगंजमध्ये शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी संवाद

14:58 November 18

मुंबै बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण दरेकरांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबै बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण दरेकरांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

सी समरी रिपोर्ट फेटाळत मुंबई महानगर दंडाधिकारी कोर्टाकने दिले पुन्हा तपास करण्याचे निर्देश

पुढील सुनावणी 2 डिसेंबरला

12:43 November 18

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधानपरिषद निवडणुकी संदर्भात या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या वतीने विधान परिषदेत दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने संजय केनेकर यांना उमेदवारी दिली आहे.  

राजीव सातव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सातव हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांच्यावर गुजरात राज्याची महत्त्वाची जबाबदारी होती. राहुल ब्रिगेडमधील ते महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा यांना सक्रीय राजकारणात आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.  

11:43 November 18

भीमा कोरेगाव प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आयोगासमोर आपलं जबाब नोंदवणार

मुंबई -  भीमा कोरेगाव प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आयोगासमोर आपलं जबाब नोंदवणार

10:12 November 18

अमरावती हिंसाचार : भाजपच्या 'या' नेत्यांची १५ दिवसांसाठी हद्दपारी

अमरावती - अमरावती हिंसाचार प्रकरणी भाजपचे नेते आणि माजी प्रवीण पोटे, जगदीश गुप्ता यांना १५ दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. हिंसाचार प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली होती, त्यांना जामीन देताना कोर्टाने त्यांना पंधरा दिवस शहरा बाहेर राहाण्याची अट घातली आहे. 

09:14 November 18

नागपूर : दोन मित्रांच्या वादात एकाची हत्या, सेंट झेव्हियर शाळेजवळील घटना

  • नागपूर - शहरात दोन मित्रांच्या भांडणात एकाची हत्या करण्यात आली आहे
  • शहरातील नंदनवन पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे
  • सेंट झेव्हियर शाळेजवळ दोघे मित्र दारू पीत बसले होते, दारूपीत असताना दोघांमध्ये वाद झाला
  • वाद टोकाला गेल्याने आरोपी अतुल हेमराज शिवणकर याने त्याच्या मित्रावर दगडाने वार करून त्याला जागीच ठार केले
  • मृतक दिनेश राजापुरे आणि आरोपी हेमराज शिवणकर दोघे एकाच परिसरात राहतात

08:55 November 18

अमरावतीत संचारबंदीत शिथीलता : शासकीय कार्यालय आणि बँका आजपासून सुरु

  • अमरावती- हिंसाचार प्रकरणी संचारबंदीचा आज सहावा दिवस
  • आज पासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व कृषी केंद्र सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत राहणार सुरू
  • आज पासून सर्व शासकीय कार्यालये पूर्ण वेळेत सुरू राहणार तर विद्यार्थ्यांना परीक्षा करिता संचारबंदीत सूट
  • शहरातील इंटरनेट मात्रच बंदच राहणार तर शासकीय कार्यालयातील व बँकेचे इंटरनेट आज पासून सुरू होणार
  • पोलीस आयुक्त आरती सिंग यांची माहिती

08:09 November 18

Breaking

  • नागपूर -स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेरविकांत तुपकर यांना नागपूर पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली होती. दिवसभर आंदोलन केल्यानंतर त्यांना ताब्यात घेत बुलढाणा येथे सोडून देण्यात आले. 
Last Updated : Nov 18, 2021, 9:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details