मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर झालेल्या विविध आरोपांची चौकशी सुरू आहे. या चौकशीविरोधात परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना चांगलाच दणका बसला आहे.
Big Breaking : राज कुंद्राने मुंबई सत्र न्यायालयातील जामीनासाठीची याचिका घेतली मागे - बेक्रींग न्यूज
20:53 September 16
20:51 September 16
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन संस्था सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये एक नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आणि दुसरी इंडियन डेब्ट रिझोल्यूशन कंपनी आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून 30,600 कोटी रुपयांची बँक हमी दिली जाणार आहे.
20:50 September 16
पिंपरी - चिंचवडमध्ये सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 वर्षीय अल्पवयीन मुलाने 4 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
18:08 September 16
- टी - 20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहली कर्णधारपद सोडणार असून याबद्दल ट्विटरवरून त्याने माहिती दिली आहे.
17:33 September 16
मुंबई - राज कुंद्राने मुंबई सत्र न्यायालयातील जामीनासाठीची याचिका मागे घेतली असून, मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात नव्याने जामीनासाठी याचिका दाखल करणार आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलीसांनी पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानं आता त्याच आधारावर कुंद्रा जामीनाचा दावा करणार आहे.
17:32 September 16
मुंबई - प्रसिद्ध बॉडी बिल्डर मनोज पाटील यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अभिनेता साहिल खान यांच्या दबावामुळे आपण आत्महत्या करत आहोत असे मनोज यांनी पत्र लिहिले होते. आता यामध्ये मनसेने देखील मनोज यांना पाठिंबा दिला आहे. 20 सप्टेंबरला साहिल खान मनसेच्या कार्यालयात आला नाही, तर त्याला त्या पद्धतीचा इशारा देण्यात येईल, असं मनसेने म्हटलं आहे. बॉडी बिल्डर मनोज पाटील याला न्याय नक्की मिळेल, असा विश्वास मनोज पाटील याच्या मित्रांना मनसेने दिला आहे.
16:39 September 16
हैदराबाद -तेलंगणामध्ये 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह रेल्वेरुळांजवळ मिळाला असून, शरीरावर असलेल्या टॅटूमुळे त्याची ओळख पटली आहे. राजूने 9 सप्टेंबरला हैदराबादमधील सैदाबादच्या सिंगरेनी कॉलनीत राहणाऱ्या 6 वर्ष मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. एक आठवड्यापासून पोलीस आरोपीचा तपास करत होते.
14:16 September 16
मुंबई - राज्यातील ओबीसी आरक्षणासंदर्भात ताबडतोब अध्यादेश काढण्यास सांगितले आहे. राज्यातील काही जिल्ह्यात आदिवासी समाजाची संख्या जास्त असल्याने ओबीसींच्या जागांवर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
14:08 September 16
अहमदाबाद - गुजरातमधील भूपेंद्र पटेल सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाने आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज दुपारी 4.30 वाजता गांधीनगरमध्ये होणार आहे.
12:45 September 16
मुंबई - आयकर विभागाने अभिनेता सोनू सूदचे घर आणि कार्यालयावरील सर्वेक्षण आज दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवले आहे. काल, 20 तासांहून अधिक काळ सोनू सूदच्या 6 ठिकाणी सर्वेक्षण ऑपरेशन करण्यात आले होते. आतापर्यंत आयटी विभागाने या सर्वेक्षणात काय साध्य केले, याची माहिती सामायिक केलेली नाही.
12:25 September 16
- केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे हवाई सर्वेक्षण केले.
12:01 September 16
पुणे - पुण्यातील नांदेड फाटा येथील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका कंपनीत भीषण आग लागली असून, यात काही कामगार अडकले आहेत. या घटनेत एकाचा मृतदेह सापडला असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. केमिकल असल्याने एकापाठोपाठ एक स्फोट होत आहेत.
11:31 September 16
जालन्यातील मराठा तरुणाच्या आत्महत्येवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या तरुणाची आत्महत्या अत्यंत दुर्देवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच तरुणांनी आत्महत्येसारखी कठोर पावले न उचलता, संयम ठेवावा, असेही ते म्हणाले. दरम्यान, संसदेत विषय आल्यानंतर 50 टक्क्याची मर्यादा तेंव्हाच काढून टाकली असती, तर आरक्षण मिळणे सोपे झाले असते, त्यावेळी केंद्र सरकारने मदत केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
11:19 September 16
मुंबई -देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी काल आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली. या यादीत देशभरातून २४ व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
08:41 September 16
मुंबई - बॉडीबिल्डर मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर मुंबईतील कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अभिनेता साहिल खानने त्रास दिल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले होते.
07:59 September 16
इनकम टॅक्सची तब्बल 20 तास सोनू सूदच्या घरी चौकशी
मुंबईत अभिनेता सोनू सूदच्या घर, कार्यालय आणि हॉटेलवर बुधवारी सकाळी 6 वाजता आयकर विभागाने छापा टाकला. आयकर विभागाचे अधिकारी तब्बल २० तासांनंतर म्हणजे गुरुवारी पहाटे सोनू सूदच्या घरातून बाहेर पडले. त्याच्या हातात यावेळी काही फाईल्स होत्या. तब्बल २० तास सोनू सूदच्या घराची झाडाझडती घेऊन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती काय पडले याची आता चर्चा सुरु आहे.
07:46 September 16
अमरावती वर्धा नदी दुर्घटना, आणखी दोघांचे मृतदेह हाती
अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीत 11 जणांना घेऊन जाणारी बोट बुडाली. यातील आता आणखी दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. बोट बुडाल्या नंतर तब्बल 45 तासानंतर दोन जणांचे मृतदेह मिळाले आहेत. यापूर्वी घटना घडली त्या दिवशीच तिघांचे मृतदेह सापडले होते. यात एक नावाडी, एक महिला आणि एका लहान मुलीचा समावेश होता. त्यामुळे आतापर्यंत एकूण 5 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. आणखी सहा जणांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी NDRF, SDRF आणि DDRF चे पथक तैनात आहे.
06:32 September 16
दिल्ली : दहशतवादी मॉड्यूलशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या इम्तियाज आणि मोहम्मद जलील या दोन व्यक्तींना दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने आज सोडून दिले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने दिली आहे.
06:15 September 16
Maharashtra Big Breaking
पालघर : एका 11 वर्षांच्या सावत्र मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयाने 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.