- ट्यूलिप फेस्टिवलला आजपासून सुरूवात
श्रीनगरमधील ट्यूलिप गार्डनमध्ये आजपासून 'ट्यूलिप फेस्टिवल'ला सुरूवात होणार आहे. हे फेस्टिवल 5 दिवस चालणार आहे. दरम्यान, हे गार्डन 25 मार्चपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आले आहे. जवळपास 35 हेक्टरमध्ये हे गार्डन असून यात 62 वेगवेगळ्या जातीची 15 लाख ट्यूलिप आणि इतर झाडे लावण्यात आली आहेत.
ट्यूलिप फेस्टिवलला आजपासून सुरूवात - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तज्ञांनी करणार चर्चा
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या दोन दिवसात विविध तज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून लॉकडाऊनचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे आज संभाव्य निर्बधांबाबत विविध विषयांवरिल तज्ञ, जाणकार आणि विश्लेषकांशी सल्लामसलत करणार आहेत.
- राहुल गांधी आज केरळ दौऱ्यावर
केरळ विधानसभेच्या प्रचारासाठी आज राहुल गांधी केरळ दौऱ्यावर आहेत. केरळमध्ये सर्व 14 जिल्ह्यांतील 140 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. हे मतदान 6 एप्रिल रोजी पार पडेल.
- अमित शाह तामिळनाडूत करणार प्रचार
तामिळनाडू विधानसभेच्या प्रचारासाठी आज आमित शाह तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. ते थिरुनेलवेली येथे प्रचार सभा करणार आहेत. दरम्यान, तामिळनाडूत २३४ मतदार संघासाठी निवडणूका होत आहेत. हे मतदान एकाच टप्प्यात होणार असून ही मतदान प्रक्रिया 6 एप्रिल रोजी पार पडणार आहे.
- डीएमके नेते एम के स्टॅलिन यांचा प्रचार दौरा
एम के स्टॅलिन आज पुदुचेरी येथे प्रचार सभा घेणार आहेत. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदार संघासाठी निवडणूका होणार असून मतदान 6 एप्रिलला होणार आहे.
- शेतकरी आंदोलनाचा 127 वा दिवस
केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनचा 127 वा दिवस आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात या प्रश्नी अनेकदा चर्चा झाली मात्र, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
- वय वर्ष 45 वरिल नागरिकांच्या कोरोना लसीकरणाचा तिसरा दिवस -
देशभरात 45 वर्षावरिल नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. या लसीकरणाचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी महाराष्ट्रात ३ लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. हा देशभरातील उच्चांक ठरला.
- छत्तीसगडचे मुख्यमंत्री आज आसाम दौऱ्यावर
आसाम विधानसभेच्या प्रचारासाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आज आसाम दौऱ्यावर आहे. आसाममध्ये 126 मतदारसंघासाठी तीन टप्प्यामध्ये निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्चला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 1 एप्रिलला झाले. आता अखेरच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 6 एप्रिलला होणार आहे.
- राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आज चंद्रपूर दौऱ्यावर
राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते संबंधित अनेक कामांचा आढावा घेणार आहेत. सकाळी 11.30 वाजता त्यांचे शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे नागपूरहून आगमन होणार आहे. दुपारी 12 वाजता केदार नियोजन भवन येथे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. - पाकिस्तान अंंध आणि बांगलादेश अंध संघांदरम्यानच्या आज टी-२० सामना
भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश अंध संघांदरम्यान टी-२ मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या अंध संघाात सामना खेळला जाणार आहे. मालिकेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत 4 एप्रिल रोजी होणार आहे.
पाकिस्तान अंध वि. बांगलादेश अंध संघातील क्रिकेट सामना