महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

News Today : आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर - पंढरपूर पोटनिवडणूक 2021

News Today : आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर

todays important news
News Today : आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर

By

Published : Mar 30, 2021, 4:56 AM IST

  • शेतकरी आंदोलनाचा आज १२४ वा दिवस

केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा १२४ वा दिवस आहे. अनेकदा सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चा झाली. पण अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत हे कायदे रद्द करण्यात येणार नाहीत. तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे.

शेतकरी आंदोलन
  • पंढरपूर पोटनिवडणूक : समाधान आवताडे उमेदवारी अर्ज भरणार

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. समाधान आवताडे आज भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक तसेच जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि पदाधिकारी आज सकाळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.

समाधान आवताडे
  • पंढरपूर पोटनिवडणूक : भगिरथ भालके भरणार उमेदवारी अर्ज

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कै. भारत भालके यांचा मुलगा भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भगिरथ भालके आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता भरणे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेससह इतर पक्षातील प्रमुख दिग्गज नेते पंढरपुरात येण्याची शक्यता आहे.

भगिरथ भालके
  • नाना पटोलेची पत्रकार परिषद

नाना पटोले आज भंडारा दौऱ्यावर आहेत. ते आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यात पटोले काय बोलणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचा धडाका लावला आहे. ते विविध विषयांवर आपले मत मांडताना पाहायला मिळत आहेत.

नाना पटोले
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुद्दुचेरीत

पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी सहा एप्रिलला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुद्दुचेरीत
  • राहुल गांधी आसाम दौऱ्यावर

काँग्रेस नेते राहुल गांधी आज आसाम दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आसाममध्ये १२६ विधानसभा मतदारसंघासाठी तीन टप्प्यात मतदान होत आहे. यातील पहिला टप्प्यातील मतदान प्रक्रिया २७ मार्चला पार पडली. आता दुसरा टप्पा १ एप्रिल आणि तिसरा टप्प्यातील मतदान ६ एप्रिलला पार पडेल. यासाठी आज राहुल गांधी आसाममध्ये प्रचारसभा घेणार आहेत.

राहुल गांधी आज आसाम दौऱ्यावर
  • अमित शाह आज नंदीग्राममध्ये

पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी निवडणूक होत आहे. बंगालमध्ये ८ टप्पात मतदान होणार आहे. यातील पहिल्या टप्पातील मतदान प्रक्रिया २७ मार्चला पार पडली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान १ एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी गृहमंत्री आज अमित शाह नंदीग्राममध्ये येणार आहे. ते नंदीग्राममध्ये सभेला संबोधित करणार आहेत.

अमित शाह आज नंदीग्राम दौऱ्यावर
  • मिथून चक्रवर्ती यांचा रोड शो

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्पातील प्रचाराला भाजपने सुरूवात झाली आहे. नंदीग्राममध्ये आज बॉलीवूड अभिनेता मिथून चक्रवर्ती रोड शो करणार आहेत.

मिथून चक्रवर्ती
  • प्रियंका गांधी केरळ दौऱ्यावर

केरळमध्ये पुढील महिन्यात ६ एप्रिलला विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आजपासून दोन दिवसाच्या केरळ दौऱ्यावर आहेत. त्या आज त्रिवेंद्रम आणि कोल्लम येथे प्रचार करणार आहेत. यात त्या रोड शो आणि सभांना संबोधित करतील.

प्रियंका गांधी आज केरळमध्ये
  • भीमराव पांचाळे यांचा आज वाढदिवस

गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा आज वाढदिवस. भीमराव यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्‍यातील आष्टगाव येथे झाला. अमरावतीचे भय्यासाहेब देशपांडे आणि अकोल्याचे एकनाथपंत कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी नऊ वर्षं शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. वाणिज्य शाखा आणि मराठी-हिंदी भाषा साहित्य तसेच संगीत यांतील पदवी अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केले आहेत. सुरेश भटांचे गजल अभियान उत्तरोत्तर दृढ करण्यात गजलनवाज भीमराव पांचाळे यांचा मोठा वाटा आहे. मान्यवर शास्त्रीय गायनाच्या उस्तादांकडून परिपूर्ण शिक्षण घेऊनही भीमरावांनी मराठी गजल गायनाचे व्रत घेतले. त्यांनी 'गजल सागर' ही संस्था स्थापन केली. त्याद्वारे गजल कार्यशाळा, ग्रंथ प्रकाशन असे स्तुत्य उपक्रम राबविले आहेत.

भीमराव पांचाळे

ABOUT THE AUTHOR

...view details