महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

News Today : आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर - PM modi news

News Today : आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Feb 26, 2021, 6:38 AM IST

  • व्यापाऱ्यांचे देशव्यापी संप

विविध मागण्यांसाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल ट्रेडर्स (कॅट) या व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेने आज देशव्यापी संप पुकारला आहे. यामुळे आज देशातील सर्व व्यापारी बाजारपेठा बंद असण्याची शक्यता आहे.

आज व्यापाऱ्यांचा देशव्यापी संप
  • महाराष्ट्रात मालवाहतूकदारांचे 'चक्काजाम'

विविध मगाण्यांसाठी महाराष्ट्रातील मालवाहूक संघटनांनी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामध्ये राज्यातील 10 लाख ट्रक सहभागी होणार आहेत. ई-वे बिलातील जाचक अटी रद्द करा, सर्व राज्यातील डिझेल दर कमी करत देशात एकच दर लागू करावा यासह विविध मागण्या आहेत.

थांबलेले ट्रक
  • आज नॉर्थ इस्ट युनायटेड विरुद्ध केरळ फुटबॉल सामना

गोव्यातील बोम्बोलिम येथे सुरू असलेल्या आईएसएल (इंडियन सुपर लीग) फुटबॉल मालिकेतील आज नॉर्थ इस्ट युनायटेड विरुद्ध केरळ, असा सामना रंगणार आहे.

नॉर्थ इस्ट युनायटेड संघातील खेळाडू
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आंदमान-निकोबार दौऱ्यावर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज आंदमान-निकोबार दौऱ्यावर आहेत. 1 मार्चपर्यंत ते आंदमान-निकोबार दौऱ्यावर असणार असून या काळात विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपती कोविंद
  • पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते खेलो इंडिया विंटर गेमचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यात ते आज खेलो इंडिया विंटर गेमचा शुभारंभ करतील. गुलमर्ग येथे या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्कीईंग, आइस हॉकी व स्नो शू यासह विविध खेळ या स्पर्धेत खेळले जातील.

पंतप्रधान मोदी
  • अरविंद केजरीवाल आज सुरत दौऱ्यावर आहेत

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आज सुरत दौऱ्यावर आहेत. गुजरातमध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या अनेक जागा निवडून आल्या आहेत. सुरतमध्ये आम आदमी पक्ष दुसरा मोठा पक्ष म्हणून निवडून येत विरोधी बाकावर बसणार आहे. यामुळे सुरतमधील नागरिकांचे आभार मानण्यासाठी केजरीवाल यांनी या दौऱ्याचे आयोजन केले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
  • झारखंड राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून होणार सुरू

झारखंड राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरुवात होणार आहे. हे अधिवेश 23 मार्चपर्यंत सुरू असणार आहे. अधिवेशनाच्या काळात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विधानसभेच्या आवारात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

झारखंड विधानसभा
  • हिमाचल प्रदेशचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून होणार सुरू

आजपासून हिमाचल प्रदेश राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभा
  • मध्यप्रदेशातील दीनदयाल अंत्योदय रसोई योजनाच्या दुसऱ्या सत्राचे आज शुभारंभ

मध्यप्रदेशातील दीनदयाल अंत्योदय रसोई योजनाच्या दुसऱ्या सत्राचे आज मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान शुभारंभ करणार आहेत. हा शुभारंभ व्हर्च्युअली होणार आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

ABOUT THE AUTHOR

...view details