महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

News Today : आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर

आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Feb 25, 2021, 6:42 AM IST

  • पंतप्रधान मोदींचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडु राज्यातील काही विकास कामांचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 25 व 26 फेब्रुवारी, असे दोन दिवस ते जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज आसाम दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज आसाम राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते नागाव येथे महामृत्यूंजय मंदिराची प्राण प्रतिष्ठापना करणार आहेत. त्यानंतर साडे अकरा वाजता बोरडवा व नागाव या ठिकाणी रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता कार्बी आंग्लाँग येथील रॅलीत सहभागी होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
  • केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या निवास्थानाजवळ हॉर्न बजाओ सरकार जगाओ आंदोलन

विदर्भ राज्य आंदोलन समिती वाहतूक आघाडीच्या वतीने वाहन चालक व मालकांच्या विविध मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम येथून गाड्यांचा मोर्च निघणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाजवळ रेडिसन ब्लू हॉटेल चौक आज दुपारी एक वाजता 'हॉर्न बजाओ सरकार जगाओ आंदोलन' करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
  • काँग्रेची बैठक

आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात काँग्रेसच्या जिल्हा निहाय बैठका होणार आहे. काँग्रेस आगामी महापालिकेत सत्ताधारी घटक पक्षांशी युती करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

काँग्रेस
  • भाजप पदाधिकारी घेणार राज्यपालांची भेट

साधू संतांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या विरोधात कारवाई करावी, यासंदर्भात भाजप अध्यात्मिक सेल राज्यपाल कोशारी यांची भेट घेणार आहेत.

भाजप
  • सांगलीत ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत महामेळावा

ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आज मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत सांगलीत महामेळावा पार पडणार आहे. सांगलीत पार पडणाऱ्या ओबीसी मेळाव्याच्या तारखेवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. 25 फेब्रुवारी रोजी ओबीसी जन मोर्चाच्या वतीने सांगलीत महामेळावा कोणत्याही परिस्थितीत पार पडणार असे स्पष्ट करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ओबीसी समाजातील प्रमुख लोक प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. सांगलीच्या स्टेशन चौक या ठिकाणी हा महामेळावा पार पडणार आहे.

मंत्री विजय वडेट्टीवार
  • जळगाव महापालिकेचा वार्षिक अंदाजपत्रक होणार सादर

जळगाव महानगरपालिकेत 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक आज सकाळी ११ वाजता महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी सादर करणार आहेत. गेल्या वर्षभरात कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच पुन्हा वाढणारे रुग्ण याचा परिणाम पालिकेच्या अंदाजपत्रकावर दिसणार असून, यंदा प्रशासनाकडून कोणतीही करवाढ होण्याची शक्यता नाही. गेल्या वर्षी महासभेने १२०० कोटींचा बजेट मंजूर केला होता.

जळगाव महापालिका
  • आईएसएलचा सामना

गोव्यातील बोम्बोलिम येथे सुरू असलेल्या आईएसएल (इंडियन सुपर लीग) फुटबॉल मालिकेतील आज जमशेदपूर विरुद्ध बंगळुरू, असा सामना रंगणार आहे.

फुटबॉल सामन्यावेळचे छायाचित्र
  • अभिनेता शाहिद कपूरचा वाढदिवस

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरचा आज 40 वा वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने आजवर बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. 2019 साली त्याचा 'कबिर सिंग' हा चित्रपट बराच गाजला. वेगवेगळ्या कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत होता. या चित्रपटात त्याने रागीट प्रियकराची भूमिका साकारली होती. मात्र, शाहिदचे इतर चित्रपटही त्याच्या भूमिकांमुळे गाजले आहेत. यामध्ये 'इश्क विश्क', 'विवाह', 'हैदर', 'उडता पंजाब' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

शाहिद कपूर
  • अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा वाढदिवस

सिने अभिनेत्री उर्वशी रौतेला हीचा आज 28 वा वाढदिवस आहे. तिने 2013 साली सिंग साहब दि ग्रेट या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले आहेत. हिंदी चित्रपटासह तिने कन्नड व बंगाली चित्रपटातही काम केले आहे.

उर्वशी रौतेला

ABOUT THE AUTHOR

...view details