- तौत्के चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकणार
अरबी समुद्राच्या आग्नेय भागात लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच येत्या 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. तसेच या वादळाचा परिणाम 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्यावरही होण्याची शक्यता असल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.
- कोल्हापुरात आजपासून कडक लॉकडाऊन -
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आठ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 15 मे रोजी रात्री बारा वाजल्यापासून 23 मे रात्री 12 पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊन काळात उद्योग, बँका, खासगी कार्यालय, किराणा आदी गोष्टी पूर्णपणे बंद असणार आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज सायंकाळी याबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. जिल्ह्यात तब्बल 12 हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण असून 3 हजारांच्या आसपास रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे प्रशासनाने हा लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे.
- गोव्यात आजपासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू -
गोवा राज्यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण 15 मे पासून सुरू होणार आहे. राज्यातील 35 आरोग्य केद्रांमध्ये हे लसीकरण सुरू होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘कोविन’ या पोर्टलवर नोंदणी केलेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटाोतील नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. सध्या राज्यामध्ये सुरू असलेले 45 वर्षांवरील नागरिकांसाठीचे लसीकरणही सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
- लातूरमध्ये आजपासून विकेंड लॉकडाऊनला सूरुवात -
जिल्ह्यात 15 व 16 मे 2021 या कालावधीत विकेंड लॉकडाउन प्रमाणेच कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले होते. त्याप्रमाणे या विकेंड लॉकडाऊनला आज सुरुवात होईल.
- आरएसएस प्रकरण : भिवंडी न्यायालयात आज होणार राहुल गांधीवर सुनावणी